Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : राणी लंकेंचे विखेंना 'रिटर्न गिफ्ट'; उत्तरेचं पार्सल उत्तरेला

Rani Lanke On Sujay Vikhe Patil : महायुती भाजपचे खासदास सुजय विखे यांच्याविरोधात पती नीलेश लंके यांना निर्णायक मताधिक्य मिळताच, राणी लंके यांनी खासदार विखेंवर टीका केली. लोणीचा पाहुणा परत पाठवून दिला, अशा शब्दात राणी लंके यांनी सुनावले.
Rani Lanke Sujay Vikhe
Rani Lanke Sujay VikheSarkarnama

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result Live News : नगर दक्षिणमध्ये विजयाजवळ जात असताच माजी आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी विखेंवर निशाणा साधला. 'उत्तरेचं पार्सल उत्तरं पाठवून दिलं. लोणीचा पाहुणा घरी पाठवून दिला' अशी तिखट प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांनी व्यक्त केली.

नीलेश लंके यांनी त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या माध्यमातून नगर दक्षिणमध्ये संपर्क यात्रा काढली होती. राणी लंके यांच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. नगर दक्षिणवर स्वार होण्यासाठी नीलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्याबरोबर गेले. लोकसभेची ही निवडणूक सोपी नव्हती. या लढाईत नीलेश यांच्याबरोबर राणी या पत्नी म्हणून सावलीसारख्या होत्या. पारनेरचा त्यांचा बालेकिल्ला एकट्यांनी संभाळला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पारनेरमध्ये प्रचार सभा घेतली. तिथे अजितदादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये नीलेश लंकेंना सुनावले होते. अजितदादांच्या प्रचारसभेचा परिणाम होईल, असे वाटत होते.

परंतु राणी लंके या पदर खोचून पारनेरमध्ये उभ्या राहिल्या. प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर पोहोचल्या. तिथे नीलेश लंके कशासाठी संपर्क करत आहे, याची माहिती मतदारापर्यंत पोहोचवली. या काळात राणी लंके यांच्या पायाला एकप्रकारे भिंगरी होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नीलेश लंके पारनेर सोडून नगर दक्षिणमधील सर्व विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत होते. याचवेळी राणी लंके या पारनेर पिंजून काढत होत्या. दोघे पती-पत्नी एकाच वेळी घराबाहेर प्रचाराला पडत होते.

राणी लंके या सर्व घरदार संभाळून पारनेरमध्ये पतीच्या प्रचारात होत्या. नीलेश लंके पहाटे सहा वाजता प्रचाराला बाहेर पडायचे, त्याचवेळी राणी लंके यांचा त्यांच्यासाठीचा डबा तयार असायचा.

नीलेश लंके प्रचारासाठी बाहेर पडल्याबरोबर राणी लंके देखील पारनेरमध्ये प्रचारासाठी फिरायच्या. हा दोघा पती-पत्नीचा नित्यक्रम जवळ-जवळ 40 दिवस चालू होता. ही मेहनत आता विजयाच्या मताधिक्यातून दिसू लागल्यावर राणी लंके यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

Rani Lanke Sujay Vikhe
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : नीलेश लंकेंना मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे, रोहित पवारांचा गजहब

"या विजयासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. विरोधकांकडून खूप काही सहन करावे लागले. पण आम्ही उत्तरेचं पार्सल उत्तरेला पाठवून दिलें. लोणीचा पाहुणा परत गेला", अशा शब्दात राणी लंके यांनी विरोधक विखेंवर टीका केली.

Rani Lanke Sujay Vikhe
Nilesh Lanke : नगर हबकलं, नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राला रात्रभर खडा पहारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com