Rajendra Phalke On Radhakrishna Vikhe : मतदारांनी धनशक्तीला 'पुष्पा स्टाइल' सुनावलं; 'राष्ट्रवादी'च्या फाळकेंनी विखेंना डिवचलं!

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : पक्षफुटीनंतर नगर दक्षिणमध्ये भाजपविरोधात शरद पवारांकडे चेहरा कोण? अशी चर्चा सुरू झाली. परंतु नगर जिल्ह्यातील शरद पवारांचे विश्वासू, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावत नीलेश लंके यांना खेचून आणलं.
Rajendra Phalke Radhakrishna Vikhe
Rajendra Phalke Radhakrishna Vikhesarkarnama

Ahmednagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांनी विजयाची 'तुतारी' वाजवली. नीलेश लंके यांना शरद पवारांच्या संपर्कात आणण्यापासून ते त्यांच्या विजयापर्यंतचा मार्ग सोपा नव्हता. हा विजयाचा मार्ग सोपा केला तो, शरद पवारांचे खंदे समर्थक आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची! या विजयावर त्यांनी शेलक्या शब्दात टिप्पणी केली. मतदारांनी धनशक्तीसमोर 'पुष्पा' स्टाइलनं उभं राहत 'झुकेगा नही', असा हा विजय असल्याचे राजेंद्र फाळके यांनी म्हटले.

नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीनं यश मिळवले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. भाजप (BJP) उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात सरळ लढत झाली. राष्ट्रवादी फुटीपूर्वी नीलेश लंके यांचे नाव खासदारकीसाठी चर्चेत होते.

पक्षफुटीनंतर नीलेश लंके यांनी अजित पवार यांना साथ केली. त्यामुळे भाजपविरोधात शरद पवारांकडे चेहरा कोण? अशी चर्चा सुरू झाली. परंतु नगर जिल्ह्यातील शरद पवारांचे विश्वासू, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावत नीलेश लंके यांना खेचून आणलं. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नीलेश लंके यांनी शरद पवार यांनी खासदारकीचा उमेदवार जाहीर केला.

नीलेश लंके यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आणण्यापासून ते त्यांच्या विजयाच्या मार्गापर्यंत महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. परंतु शरद पवारांचे विश्वासू राजेंद्र फाळके यांनी अतिशय योग्यपद्धतीने नीलेश लंके यांच्याभोवती वातावरण निर्माण करून त्यांच्याकडून विजयाची तुतारी वाजवून घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांची सांगड राज्यापेक्षा स्थानिक पातळीवर घालण्याचे जिकीरचं काम होते.राजेंद्र फाळके यांनी ती लिलया पेलली. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची सांगड घालत नीलेश लंके यांचा विजय खेचून आणला. विखे आणि त्यांच्या विखे यंत्रणेचा प्रचंड दबाव होता. नीलेश लंके यांनी निवडणुकीच्या सुरवातीपासून धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, अशी ही लढाई असल्याचे म्हटले होते. यामागे शरद पवार यांच्यासह राजेंद्र फाळके यांची युक्ती होती आणि ती यशस्वी ठरली. सर्वसामान्य मतदार या निवडणुकीत वरचढ ठरत गेला. निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे होतच, पण ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली. हा निवडणुकीचा मोठा ट्रनिंग पाईंट ठरला आणि तिथेच विखे घायाळ झाले.

Rajendra Phalke Radhakrishna Vikhe
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : नीलेश लंकेंना मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे, रोहित पवारांचा गजहब

नीलेश लंके यांच्या विजयावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी अतिशय मार्मिक प्रतिक्रिया देत विखेंना टोला मारला. 'या निवडणुकीत सर्वसामान्यांची ताकद बोटावरील शाईत दिसली. या तुलनेत धनदांडगे घाबरून राहिले. धनशक्तीसमोर ते झुकले. परंतु सर्वसामान्य मतदारांनी पुष्पा चित्रपटातील 'पुष्पा स्टाइल'ने उत्तर देत, 'झुकेगा नही', असा मेसेज धनशक्तीला दिला', अशी खोचक प्रतिक्रिया देत राजेंद्र फाळके यांनी विखेंना डिवचले.

Rajendra Phalke Radhakrishna Vikhe
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : नगरमध्ये विखेंच्या 1991 च्या पराभवाचीच चर्चा; पवारसाहेबांचा पठ्ठया लंके ठरणार जायंट किलर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com