Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर काँग्रेसची मवाळकीची भूमिका?

Congress : तांबे कुटुंबियांशी आमचे वैर नाही, नाना पटोले यांचे विधान
Congress and Satyajit Tambe
Congress and Satyajit Tambe Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता ऐनवेळी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

मात्र, अपक्ष अर्ज दाखल करूनही सत्यजीत तांबे मोठ्या मताधिक्याने निवडू आले. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील (Shumbhagi Patil) यांचा पराभव झाला. तांबे यांचा विजय झाल्यानंतर आता काँग्रेसने मवाळकीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Congress and Satyajit Tambe
Pune Politics News : भाजपाचे उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादी पत्ते उघडणार!

सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने आणि सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच याबाबत तांबे यांची चौकशी करण्याचे आदेश काँग्रेसच्या हायकमांडने दिले होते.

तर प्रदेश काँग्रेसनेही तांबे यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. पण तांबे निवडून आल्यानंतर मात्र, काँग्रेस मवाळकीची भूमिका घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Congress and Satyajit Tambe
Teacher Graduate Election : 'बारामती जिंकण्याचे स्वप्न बघणारे स्वतःच्या बालेकिल्ल्यात पराभूत' !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत आज सकाळी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं. ते म्हणाले, ''तांबे कुटुंबियांशी आमचे वैर नाही, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे मवाळकीची भूमिका घेतली.

तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावर भाष्य करत काँग्रेस पक्षानेही मनाचा मोठेपणा दाखवावा आणि सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी फार ताणू नये, असं सूचक वक्तव्य केलं.

Congress and Satyajit Tambe
Congress News : काँग्रेसचा एक उमेदवार गेला; पण दोन मतदार संघ आणले खेचून : भाजपचे चाणक्य फेल

सत्यजीत तांबे यांचा विजय झाल्यानंतर ते माध्यमाशी बोलताना म्हणाले, ''मला आरोपीच्या पिजऱ्यात उभं करण्याच काम केलं जात आहे. मात्र, आपण योग्यवेळी निर्णय घेऊ'', असं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. त्यामुळे आता ते येत्या सात फेब्रुवारीला काय भूमिका माडंतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com