Pune Politics News : भाजपाचे उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादी पत्ते उघडणार!

Kasaba By-Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे वातावरण तापले
BJP, NCP,
BJP, NCP, Sarkarnama
Published on
Updated on

Kasaba By-Election : पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आज रात्री उशीरा जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे.

भाजपाचे उमेदवार ठरल्यानंतरच कसब्यातून काँग्रेसचा (Congress) तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्याची महाविकास आघाडीची रणनीती असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टीकडून दोन्ही ठिकाणी दिवंगत आमदारांच्या घरातून उमेदवारी मिळाली तर काय करावचे. कोणता उमेदवार द्यायचा याची रणनीती आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आली आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

BJP, NCP,
Satara : बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्र बसून पराभवाची कारणे शोधणार : शंभूराज देसाई

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पिंपरीत इच्छुकांच्या मुलाखती घेत एक बैठकही घेतली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार असल्याचे स्पष्ट करत ज्या इच्छुकाच्या प्रभागात कमी मते मिळतील त्यांनी महापालिका निवडणुकीतील उमेदवारी विसरून जावे, असा इशारा पवार यांनी इच्छुक नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे निवडणूक लागलीच तर इच्छुकांची परीक्षाच ठरणार आहे.

BJP, NCP,
Congress News : काँग्रेसचा एक उमेदवार गेला; पण दोन मतदार संघ आणले खेचून : भाजपचे चाणक्य फेल

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातून त्यांच्या पत्नी अश्‍विनी यांना भाजपाची उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार का? अशी एक चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय झाला असला तरी अजित पवार यांचे लक्ष्मण जगताप हयात असताना त्यांच्याशी असलेले संबंध पाहता जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेणार हे अश्‍विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली तरच स्पष्ट होणार आहे.

BJP, NCP,
Amravati Graduate Election : रणजीत पाटलांनी धुळीस मिळवली देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा !

दरम्यान, उमेदवारीच्या चर्चेवरून सुरू असलेल्या चर्चेवरून जगताप कुटुंबाच्यावतीने आज एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. शंकर जगताप यांचे चिरंजीव अदित्य जगताप यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

त्यामध्ये आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत. आम्हाला कोणतीच ताकद वेगळे करू शकत नाही, असे अदित्य यांनी म्हटले आहे. त्यामुळे जगताप कुटुंबात उमेदवारी कुणाला मिळते हे महत्वाचे नाही तर निवडणूक बिनविरोध न होता लढायाची वेळ आल्यास पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्धार जगताप कुटुंबाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com