Chhagan Bhujbal News : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पूर्वाश्रमीचे भारतीय जवनता पक्षाचेच आहेत. त्यांनी केलेले पुलवामा दुर्घटनेविषयी केलेले विधान अतिशय गंभीर आहे. त्यामुळे देशातील तपास यंत्रणांनी त्यांच्या विधानाविषयी तपास केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Chhagan Bhujbal deemands investigation on Pulwama accident of army recruits)
बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत (APMC election) येवला येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांच्या विधानाचा उल्लेख केला. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय गंभीर आहेत. केंद्रीय तपास (Centre agencies) यंत्रणांनी त्यावर तपास करावा अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.
यावेळी ते म्हणाले, जम्मू काश्मीरचे पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक हे भाजपचेच होते. ते पुलवामा हल्ल्याबाबत बोलत असल्याने तपास यंत्रणांनी याची सखोल चौकशीची गरज आहे अशी प्रतिक्रिया श्री. भुजबळ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना दिली.
पुलवामाचा हल्ला हा भाजप सरकारच्या चुकीमुळे झाला होता असे खळबळजनक वक्तव्य मलिक यांनी केले आहे, त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्याची शहानिशा करण्याची गरज असून केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा तपास करावा असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पॅनेलच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असून याबाबत स्थानिक पातळीवरील नेते निर्णय घेतील, तो अंतिम राहील. सर्वांनी कामाला लागावे, बाजार समितीवर आपलीच सत्ता राहील यासाठी शेतकरी, मतदारांपर्यंत संपर्क करावा असे आवाहन माजी मंत्री भुजबळ यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.