Twist in Nashik APMC : पॅनेल होण्याआधीच शिवाजी चुंभळेंना पोलिसांचे पकड वॉरंट!

भ्रष्टाचार खटल्याप्रकरणी शिवाजी चुंभळेंविरुद्ध जिल्हा न्यायालयाचे पकड वॉरंट
Shivaji Chumbhale & Devidas Pingle
Shivaji Chumbhale & Devidas PingleSarkarnama

Nashik APMC election news : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात राजकीय आरोप करणारे शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांना काल मोठा धक्का बसला. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कटला सुरु आहे. त्यात ते सातत्याने अटक टाळत होते. त्याबाबत जिल्हा न्यायालयाने पोलिसांची कानउघडणी करीत चुंभळे यांच्या विराधात पकड वॉरंट काढले. (There was a big setback to Shivaji Chumbhale in APMC election)

नाशिक (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीचे (APMC election) वातावरण तापले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधात शिवसेनेचे (Shivsena) नेते शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांनी पॅनेलची घोषणा केली आहे. त्यांना भाजपने (BJP) देखील साथ दिली आहे. मात्र पॅनेलची घोषणा आधीच त्यांना मोठा धक्का बसला.

Shivaji Chumbhale & Devidas Pingle
APMC election politics : बाजार समित्यांतून दुसऱ्या हादऱ्याची भाजपची व्यूहरचना!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये इ-नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून तीन लाख स्वीकारताना माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना अटक केली होती. या प्रकरणी खटला सुरू असून, चुंभळे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आता ऐन बाजार समिती निवडणुकीच्या काळातच चुंभळे यांना पकड वॉरंट आल्याने चुंभळे गटाला धक्का बसला आहे.

नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर या बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत इ-नाम योजनेचे काम सुरू झाले. या योजनेत समावेश झाल्याने कामाचा व्यापही वाढला. याकामी दहा कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. या भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्यात आपण कायमस्वरूपीही होऊ शकतो, अशी आस लागली होती. काही दिवसांपूर्वी याच इ-नाम योजनेतील पाच कर्मचाऱ्यांना काही कारणास्तव काढून टाकण्यात आले.

Shivaji Chumbhale & Devidas Pingle
Mahavikas Aghadi Pachora news: निधीच्या वल्गना करणाऱ्या शिंदे गटाने जागा का विकली?

कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. यातील राहुल थोरात यांनी सभापती चुंभळे यांना रुजू करून घेण्याची विनंती केली असता चुंभळे यांनी त्यांच्याकडे अंदाजे दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. यात तडजोड होऊन सुरवातीस तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ ऑगस्ट २०१९ ला माजी सभापती शिवाजी चुंभळे तीन लाखांची लाच घेताना पकडले. जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांच्या न्यायालयात विशेष खटला सुरू आहे. शनिवारी (ता. १५) चुंभळे यांच्या नावे पकड वॉरंट जारी करण्यात आले असून, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना आदेश देण्यात आले आहे.

Shivaji Chumbhale & Devidas Pingle
Dy. Collector Transfers : मध्यरात्री झाल्या ८२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या!

आदेशात म्हटले आहे, की शिवाजी चुंभळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक संशोधन अधिनियम २०१८ चे कलम ७ प्रमाणे अपराधाचा आरोप आला आहे. त्यापेक्षा तुम्ही सदरहू संशयितास माझे पुढे आणावे, तुम्हास या वॉरंटद्वारे हुकूम केला आहे.

यात लिहिल्याप्रमाणे चूक होऊ नये. तसेच सदरहू संशयितास पुढील तारीख २६ जूनला माझ्यापुढे हजर राहतील, याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच आपण स्वतः पाच हजार रुपये रकमेचे तारण लिहून द्यावे व पाच हजार रुपयांचा एक जामीन दिल्यास यांना सोडून द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

Shivaji Chumbhale & Devidas Pingle
NCP News : मोठी बातमी : भाजपचे पाच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ; प्रदेशाध्यक्षांचा दावा

शह-प्रतिशहचे राजकारण

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. या निवडणुकीत आजी-माजी खासदार आमनेसामने असले तरी खरी लढत ही पिंगळे-चुंभळे अशीच आहे. शह-प्रतिशहचे राजकारण सध्या सुरू आहे. यात माजी सभापती शिवाजी चुंभळेंना पकड वॉरंट जारी झाले आहे. बाजार समितीचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे प्रचारादरम्यान या गोष्टीची कितपत झळ बसते, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com