Abdul Sattar News : सत्तार संतापले, बंद पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार!

Agriculture Minister Sattar instructs to take action against traders-व्यापाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलेले असताना बंद पाळून वेठीस धरणे बेकायदेशीर असल्याचे मंत्री म्हणाले.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : कांदा व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात बंद पुकारला आहे. त्यांच्या काही मागण्या केंद्र तर काही राज्य शासनाशी संबंधित आहेत. त्याबाबत त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. तरीही ते बंद पाळत असल्याने त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. (onion Traders should withdraw there agitation)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) बुधवारी एका खासगी कार्यक्रमासाठी येवला (Nashik) येथे आले होते. या वेळी त्यांनी कांदा व्यापाऱ्यांच्या बंदबाबत नाराजी व्यक्त केली. या बंदने शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान होते, असे ते म्हणाले.

Abdul Sattar
Maratha Agitation : सिन्नरमधील उपोषणाला सत्ताधारी व विरोधी दोन्ही आमदारांचा पाठिंबा!

ते म्हणाले, कांदा व्यापाऱ्यांना त्यांच्या मागण्यांबाबत येत्या मंगळवारी (ता. २६) चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. असे असताना अचानकपणे असा बेकायदेशीर बंद पाळून शासनाला व शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. या संदर्भात कृषी आयुक्त व सहकार विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

सत्तार म्हणाले, की व्यापाऱ्यांचे काही प्रश्न राज्य व काही केंद्र सरकारच्या संबंधित आहेत. ‘नाफेड’च्या कांदा खरेदीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यासंदर्भात चर्चेसाठी बोलावले असूनही बंद पुकारणे चुकीचे आहे. गणेशोत्सव सुरू असताना शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हेतू काय, असा सवाल करून चर्चा होणार असताना अचानक बंद पुकारणे चूक असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन विभागाने दिले आहेत. जिल्हाधिकारी व सहकार विभाग यावर योग्य तो निर्णय घेईल.

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना ही भूमिका चुकीची आहे. नाशिकसारख्या जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी गरजेच्या काळात अशी भूमिका घेणे चूक असल्याने कारवाईचा निर्णय घेतला. कृषी आयुक्त सुनील चव्हाण तसेच जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी चर्चा करून कारवाईचे स्वरूप ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Abdul Sattar
NCP Agitation : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भाजपने कारवाई करावी!

या वेळी नगरसेवक निसार निंबुवाले, रिजवान शेख, रईस मौलवी, मुश्ताक साहिब, जमीर जहागीरदार, शकील जहागीरदार, अकिल शेख, साहिद अन्सारी, अतुल घटे यांनी मंत्री सत्तार यांचा सत्कार केला. या वेळी मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Abdul Sattar
Shirdi Crime News : तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; जावयाने सासुरवाडीत धारधार शस्त्राने केला हल्ला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com