Ahilyanagar Karjat : क्षमता नसलेल्या नगरसेवकांना पवारांमुळे जनाधार; उषा राऊतांनी खुर्चीला चिकटणारी नसल्याचे म्हणत बंडखोरांवर डागली तोफ

Ahilyanagar Karjat Nagaradhyaksha Usha Raut rebel councillors no-confidence motion Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या बंडखोरीवर नगराध्यक्ष उषा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली.
Ahilyanagar Karjat
Ahilyanagar KarjatSarkarnama
Published on
Updated on

Karjat Nagar Panchayat news : कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलटवण्यासाठी अखेर अविश्वासनाचे हत्यार उपसलं आहे.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात येत सत्ताधारी गटातील आठ, काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन नगरसेवकांना बरोबर घेऊन अविश्वास ठराव दाखल केला आहे. यावर नगराध्यक्ष उषा राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते नामदेव राऊत यांनी बंडखोराच्या भूमिकेत असलेल्या नगरसेवकांवर पत्रकार परिषद घेऊन तोफ डागली आहे.

नगराध्यक्षा उषा राऊत यांनी मी खुर्चीला चिकटून बसणारी नाही. काल पण राजीनामा द्यायला तयार होते अन् आज देखील तयार आहे. नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांचा राजीनामा सोबत घ्यावा, या कालच्या भूमिकेवर उषा राऊत यांनी ठाम असल्याचे पुन्हा सांगितले. क्षमता नसणारे काही नगरसेवक या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ते केवळ आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि सुनंदा पवार यांच्या आशीर्वादाने. नगरपंचायत निवडणुकीत मिळालेला जनाधार हा पवार कुटुंबियांचा होता, असे म्हणत उषा राऊत यांनी बंडखोरांची भूमिकेत असलेल्या नगरसेवकांना डिचवलं.

Ahilyanagar Karjat
Shiv Sena Vs BJP : 'दरबार दरबार खेळू या'! भाजपचा 'जनता', तर शिंदेसेनेचा 'लोक' दरबार!

सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी असे थेट सहलीवर निघून जाण्यापेक्षा आमदार रोहित पवार यांच्याशी समोरासमोर बसून चर्चेसाठी बसावे. निश्चित त्यांच्या महत्वकांक्षेचा सन्मान ते राखतील, असेही उषा राऊत यांनी म्हणत बंडखोरांना पुन्हा परतीचे दरवाजे खुले असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

Ahilyanagar Karjat
Waqf Amendment Bill : 'वक्फ' विरोधात सुनावणी कधी? सरन्यायाधीशांनी सिब्बलांना करुन दिली न्यायव्यवस्थेची आठवण

नामदेव राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ अधिक असल्याने राष्ट्रवादीला (NCP) नगराध्यक्ष,तर काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद ठरले. तसेच या दोन्ही पदाचा काळ वरिष्ठ नेत्यांच्या शब्दानुसार ठरविला गेला. मात्र उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी सव्वा वर्षात राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तो दिला नाही, याची आठवण करून दिली.

न्यायालयीन आणि सरकारच्या धोरणानुसार, ओबीसी आरक्षणाचा निर्णय प्रलंबित राहिल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांचे पद कायम राहिले. राजकारणात सहकारी मित्रांना पदाची महत्वकांक्षा असणे गैर नाही. पण त्यांनी तीच महत्त्वकांक्षा उघडपणे आमदार रोहित पवारांच्या समोर व्यक्त करणे आवश्यक होते. आपली नाराजी जाहीर न करता सर्वानुमते निवडलेले गटनेते, उप गटनेते आणि इतर नगरसेवकांनी चुकीचा पायंडा पाडू नये, असेही नामदेव राऊत यांनी म्हटले.

नगराध्यक्षा उषा राऊत राजीनामा देण्यास मागे देखील तयार होते. आजदेखील तयार आहेत. मात्र उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी देखील राजीनामा द्यावा. चर्चेअंती ज्याचे नाव सर्वानुमते ठरेल त्यांना उघड पाठींबा राहील. गटनेत्यांनी असा निर्णय घेणे उचित नाही, असेही नामदेव राऊत यांनी म्हटले.

राम शिंदेंचे राऊतांवर प्रेम

2009 ते 2019 या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत प्रामाणिकपणे प्रा. राम शिंदेंचे राजकीय काम केले. महामंडळावर घेऊ, असा अनेक वेळा शब्द दिला. मात्र त्यांनी तो कधीच पाळला नाही, अशी खंत व्यक्त करून कर्जतच्या विकास कामांसाठी आमदार रोहित पवारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. सहलीवर आमचे नगरसेवक नेणे हा राऊत यांच्यावरचा द्वेषच दिसतो. प्रा. राम शिंदेंनी आपणांस दिलेला शब्द कधीच पाळला नाही. त्यांनी उघड उघड आईची शपथ वाहून याची शाश्वती द्यावी, असे खुले आव्हान राऊत यांनी सभापती प्रा. राम शिंदेंना पत्रकार परिषदेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com