Shiv Sena Vs BJP : 'दरबार दरबार खेळू या'! भाजपचा 'जनता', तर शिंदेसेनेचा 'लोक' दरबार!

Shiv Sena minister Pratap Sarnaik Lok Darbar Palghar district BJP Ganesh Naik guardian minister : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे भाजपचे गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात लोक दरबार घेणार आहेत.
Shiv Sena Vs BJP
Shiv Sena Vs BJP Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई लपून राहिलेली नाही. भाजपने मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक यांना पाठवून जनता दरबार घेतले होते. भाजपची ही कृतीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली.

भाजपला जशाच तसे उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सरसावलीय. शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात लोक दरबाराची तयारी केली आहे. तसे बॅनर पालघर जिल्ह्यात झळकले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील या दरबारावरून 'दरबार दरबार खेळू या', असे आता म्हटले जाऊ लागले आहे.

पालघरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक लोक दरबार घेणार आहे. हा लोक दरबार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नऊ एप्रिलला दुपारी एक वाजता होणार आहे. या लोक दरबाराची जय्यत तयारी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. पालघरमध्ये महत्त्वाच्या चौकांमध्ये तशी बॅनरबाजी करण्यात येत आहे.

Shiv Sena Vs BJP
Karjat Municipal Council : एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता उलटणार? भाजपच्या प्रा. राम शिंदेंची खेळी 13 नगरसेवक यशस्वी करणार?

दुसरीकडे, भाजपच्या (BJP) जनता दरबाराला एकनाथ शिंदे यांच्या जनता दरबारातून उत्तर देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेतले. एकदा सोडून दोन वेळा मंत्री गणेश नाईक यांचे जनता दरबार झाले.

Shiv Sena Vs BJP
Deenanath Mangeshkar Hospital Tax : 48 तासांत मंगेशकर रुग्णालयाचे 27 कोटी वसूल करा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'नाहीतर मी आंदोलनाला बसेल'

भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या या जनता दरबारावरून एकनाथ शिंदे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूसवर राज्यात चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे संदर्भ देखील त्याला दिले जात होते. शिवसेनेकडून योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल, अन् तो करारा जबाब असेल, असे सूचक सांगण्यात आलं होतं.

भाजप मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे इथं घेतलेल्या जनता दरबारावर सावरासावरी करताना, भाजपने मला इथं संपर्कमंत्री नेमलं आहे. त्यातून लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे. हा जनता दरबार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेविरोधात नाही, असे देखील म्हटले होते. पण, त्यामागील राजकारण माहिती नसल्याचा एकनाथ शिंदेंची शिवसेना तेवढी नासमज देखील नाही.

शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकदरबार नऊ एप्रिलला होत आहे. भाजपच्या जनता दरबाराला लोक दरबारातून उत्तर असेल, अशी चर्चा रंगली आहे. या लोक दरबारामुळे भाजप अन् शिवसेनेचा अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com