Nilesh Lanke On Sujay Vikhe : लंकेंनी खेचली दुखती नस! ‘18 गुन्हे अन् उद्घाटन’ किस्स्याने विखेंभोवती खळबळ

Ahilyanagar Police Drugs Case: Sujay Vikhe Targets Nilesh Lanke : अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातील ड्रग्ज प्रकरणारवर सुजय विखे पाटलांच्या आरोपांना खासदार नीलेश लंकेंनी प्रत्युत्तर देताना, खळबळ उडवून दिली.
Nilesh Lanke On Sujay Vikhe
Nilesh Lanke On Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar police drugs case : अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातील लंपास ड्रग्ज प्रकरणाची पारनेर लिंक सांगताना, भाजपचे सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.

यावर खासदार लंके यांनी काही वेळातच, विखे पाटलांना शिर्डीतील गुन्हेगारी अन् 18 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच्या कार्यालय उद्घाटनाचा किस्सा सांगून, आरसा दाखवला. साईंच्या अन्नछत्राबाबत वादग्रस्त वक्तव्य, शिर्डीतील गु्न्हेगारी थांबववी, त्यानंतर पारनेरला बदनाम करणं थांबवावं, असा टोला देखील खासदार लंके यांनी लगावला.

'अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका आणि आपली स्वतःची बदनामीची जाणीवपूर्वक, आरोपांची मालिका रचली जात असून, ड्रग्ज प्रकरणाचे पारनेरशी कनेक्शन जोडण्याऐवजी शिर्डीत (Shirdi) नेमकं काय सुरू आहे, याची चौकशी व्हायला हवी,' अशी मागणी खासदार नीलेश लंकेनी ड्रग्ज प्रकरणापासून ते नगर–मनमाड रस्त्याच्या कामापर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

अहिल्यानगर 'एलसीबी'चा कर्मचारी श्यामसुंदर गुजर ड्रग्ज प्रकरणात अडकलेला असून, तो पूर्वी पारनेरमध्ये कार्यरत होता, याचा उल्लेख करत खासदार लंके (Nilesh Lanke) म्हणाले, “ड्रग्ज कोणाच्या घरात ठेवले होते, त्याला एलसीबीमध्ये नियुक्त करण्यासाठी कोणी शिफारस केली, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पारनेर आणि माझ्यावर आरोप करण्याचा सोपा मार्ग निवडला जात आहे.” यामुळे शिर्डीतील गुन्हेगारी झाकून राहणार नाही, असेही लंके म्हणाले.

Nilesh Lanke On Sujay Vikhe
Parner drug link : मुख्यालयातून 20 कोटींचं ड्रग्ज गायब! 'एलसीबी'चा प्रताप, पारनेर लिंकवर संशय; सुजय विखेंचा एसपींना 'अल्टीमेटम'

खुनामधला कार्यकर्ता कोणाचा?

शिर्डीत काय चालले आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. साईबाबांनी सुरू केलेल्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, असे केविलवाणे विधान कोणी केले होते, हे जनतेला माहिती आहे. तिथे सचिन गीधे या शेतकरी कुटुंबातील तरुणाला जाळून मारले गेले, त्याचा मृतदेहही मिळाला नाही. त्या प्रकरणातील आरोपी कोण? हे आधी स्पष्ट व्हायला हवे, असा सवाल खासदार लंके यांनी केला. शिर्डीमधील एका गरीब शेतकरी पुत्राचा खून झाला. त्या खुनामधला आरोपी सुजय विखे यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावरती 18 गुन्हे दाखल होते, त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला सुजय विखे गेले होते, याची आठवण लंकेंनी करून दिली.

Nilesh Lanke On Sujay Vikhe
Mayor decision Ahilyanagar : महापौरपदावर ‘मूळ ओबीसी’ की ‘कुणबी’? वाद पेटला; विखे-जगतापांनी चेंडू थेट मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांकडे ढकलला!

ग्रोअर घोटाळ्यातील कार्यकर्ते कोणाचे?

ग्रोअर प्रकरणातील हजार–बाराशे कोटींच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख करताना खासदार लंके म्हणाले, “तो घोटाळा करणारा साळवे कोणाचा कार्यकर्ता होता? त्या टीमला अटक होऊ नये म्हणून सवलत कोणी दिली? तपास एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडे का देण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे.”

आमच्या कामावर त्यांची स्टंटबाजी

अहिल्यानगर–मनमाड रस्त्याच्या कामावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार लंके म्हणाले, “पाच वर्षे खासदार असताना हा रस्ता का झाला नाही? रस्ता खणून ठेवला गेला, मृत्यूचा सापळा बनला आणि शेकडो लोकांचे बळी गेले. मी खासदार झाल्यानंतर पहिल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले, नवा ठेकेदार नेमला आणि आज काम वेगाने सुरू आहे.”

राजकीय स्टंटवर टोलेबाजी

राजकारणात काही लोक काम करतात, तर काही लोक स्टंट करतात. आम्ही खासदार नसतानाही काम केले आणि आजही करतो. पाहणी करून देखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर आमचा भर आहे, असा टोला लंकेंनी विखे पाटलांना लगावला. कोणाला तरी पुढे करून प्रेस घ्यायला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. कुत्ते भुंकते है, हत्ती चलता है, अशा शब्दांत खासदार लंकेंनी सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com