Mayor decision Ahilyanagar : महापौरपदावर ‘मूळ ओबीसी’ की ‘कुणबी’? वाद पेटला; विखे-जगतापांनी चेंडू थेट मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांकडे ढकलला!

Ahilyanagar Mayor Decision to be Taken in Mumbai by Devendra Fadnavis & Ajit Pawar, Say Sujay Vikhe and Sangram Jagtap : अहिल्यानगर महापालिकेचा महापौर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत फायनल होईल, असे सुजय विखे अन् संग्राम जगताप यांनी सांगितले.
Sujay Vikhe Mayor
Sujay Vikhe MayorSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Mayor post : अहिल्यानगर महापालिकेत महापौर पदावर 'मूळ ओबीसी' की, 'कुणबी', बसणार यावरून चर्चा सुरू आहेत. भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी मूळ ओबीसीला संधी मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे. या मागणीचे पडसाद आता भाजप-अजित पवार राष्ट्रवादीमध्ये उमटायला सुरूवात झाली आहे.

यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सावध भूमिका घेतली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाचा निर्णय मुंबई स्तरावर होईल, असे सांगून वादाचा चेंडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात टोलावला आहे. पण मंबईत नेमकी कधी, केव्हा, बैठक होणार, त्यावर कधी निर्णय येणार, हे मात्र सुजय विखे पाटील यांनी सांगितले नाही.

मूळ ओबीसीला (OBC) महापौरपदावर संधी मिळावी, अशी मागणी आहे. त्यावर सुजय विखे पाटील म्हणाले, "मागणी करत बसतात, ती गैर नाही. मी जाती-धर्म प्रक्रियेपासून लांब राहणारा माणूस, मी यात गुंतून पडत नाही. प्रभाग क्रमांत सात मध्ये आज आपण हीच गोष्ट मोडून काढण्यासाठी, खुल्या प्रवर्गावर आपण ओबीसी उमेदवार दिला. तो जनतेने निवडून दिला. एक नंबरच्या मतांनी निवडून दिलं. याचा अर्थ असा की लोकांना विकास पाहिजे. जाती-भेदभावामध्ये लोकांना अडकायची नाही. तरी देखील एखाद्याने मागणी केली असेल, तर त्याचा विचार निश्चित करू. आम्ही सर्वांचा सन्मान करून, पुढे चाललो आहोत."

'गटनेतापदी अहिल्यानगर म्हणून, पहिली वेळ आहे की, धनगर समाजाच्या व्यक्तीला गटनेता केला. भाजपने (BJP) केला. अहिल्यानगर नाव करून, त्याचा आनंद फक्त साजरा करण्यापेक्षा, तो कृतीतून करून दाखवला आहे. अहिल्यानगर महापालिका पहिल्यादा बसते आहे. त्यामुळे भाजपकडून धनगर समाजाचा पहिला गटनेता करून दाखवला आहे,' असे विखे पाटील यांनी सांगितले. जातीच्या विवादात न जाता, सर्व एक समान आहेत.

Sujay Vikhe Mayor
OBC Mayor : भाजप-राष्ट्रवादीची सत्ता, पण शांतता नाही! ‘मूळ ओबीसी vs कुणबी’ने महापौरपदावर रण पेटलं

'जर ओबीसी दाखला असेल, तो सरकारने दिला आहे. त्या वादात न पडता, अहिल्यानगरने विकासावर चर्चा केली आहे. जनतेने भाजप-अजित पवार राष्ट्रवादीला संपूर्ण बहुमत दिलं आहे. लवकर महापौर अन् महापौर पदाची निवड जाहीर होईल. तो कोणत्या पक्षाचा आहे, ते जास्त गांभीर्याने घेतलं जाणार नाही. लोकांना विकास पाहिजे, तो आम्ही करून दाखवू,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Sujay Vikhe Mayor
Mayor No Confidence Motion : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणायचा आहे, तर हे नियम जाणून घ्या...

भाजप अन् अजित पवार राष्ट्रवादी युतीत महापौर-उपमहापौर कोण होणार, यावर चर्चा सुरू असताना, छोटा-मोठा भाऊ, अशी चर्चा सुरू आहे. यावर सुजय विखे पाटील म्हणाले, "बैठका झाल्याच नाहीत, निवडीचा प्रोग्राम लागला नाही, अगोदर बैठका घेऊन काही निष्पन्न होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय आला की, त्याची अंमलबजावणी करण्याचं आमचं काम आहे. या तिघांचा मुंबईच्या स्तरावर होईल. तो आम्हाला कळवल्यानंतर निवड प्रक्रिया होईल."

अहिल्यानगरमध्ये महायुती तुटली होती. भाजप-अजित पवार राष्ट्रवादी पक्ष युतीत लढला होता. यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना स्वबळावर लढली होती. पण वरून आदेश आल्यास, त्यांना सत्तेत घेणार का? यावर सुजय विखे पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री हे तिघे आम्हाला जो आदेश देतील, तो आम्हाला पाळावा लागेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com