

Maharashtra political controversy : सिस्पे घोटाळ्याची सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली, तर काहींचे खुलासे सुरू झाले. तुमचे कोणी नावच घेतले नाही, मग एवढे गडबडता काॽ असा सवाल भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
पारनेर इथल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील सहभागी झाले होते. खासदार नीलेश लंके यांना त्यांचे नाव न घेता थेट त्यांच्या होम ग्राऊंडवर मंत्री विखे पाटील यांनी डिवचलं आहे.
पारनेर तालुका खरेदी विक्री संघाने सुरू केलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचा प्रारंभ मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या उपस्थितीत झाला. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेत, मंत्री विखे पाटील यांनी व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांना सामान्य कार्यकर्त्याना आधार देण्यासाठी तुम्ही एकत्र राहा, असा सल्ला देत, तालुक्याच्या अस्मितेसाठी तुम्हाला यापुढे काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट केलं.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "पारनेर (Parner) तालुक्यात सध्या काय सुरू हे मी सांगण्याची गरज नाही. लोकच मला आता माहिती सांगत आहेत. याचा अर्थ सामान्य माणूस मोकळा झाला आहे. कोणतीही दहशत राहिलेली नाही." सिस्पे घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेने अनेकजण गोंधळले आहेत. आपोआप खुलासे बाहेर येवू लागले. पण मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. कोणाचे नावच घेतले नाही, तर काहीजण एवढे गडबडले काॽ असा प्रश्न मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला.
'कोणत्याही परिस्थितीत तालुका आपल्याला दुष्काळमुक्त करायचा आहे. जे स्वप्न लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिले होते, ते पूर्ण करायचे आहे. साकळाई योजनेच्या कामाला सर्व मंजूरी मिळाल्या आहेत. कुकडी प्रकल्पात अधिकचे पाणी निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. डिंबे ते माणिकडोह बोगद्याच्या कामाबरोबरच तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे काम विभागाने सुरू केले आहे,' असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
'आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कोणीही असतील, तुम्हाला एकत्रित काम करून शतप्रतिशत महायुती विजयासाठी काम करावे लागेल. राज्य सरकार तुमच्या सोबत असताना कोणाच्या दबावाला घाबरता. तालुक्याची राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. सुपा औद्यगिक वसाहतीमध्ये लक्ष घातल्यामुळेच स्थानिक युवकांना नोकरीच्या संधी मिळू लागल्या,' असा दावा मंत्री विखे पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.