Ajit Pawar Sharad Pawar BJP : अजितदादांचा शरद पवारांना थेट सवाल; 'भाजप का नाही?'

NCP Ajit Pawar Questions Sharad Pawar on BJP Stance in Mumbai : मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित कार्यक्रमात शरद पवार यांच्या पक्षातील जळगाव आणि धुळ्यातील पाच माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Ajit Pawar Sharad Pawar BJP
Ajit Pawar Sharad Pawar BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai political news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट सवाल केला आहे.

तुम्ही 2019 मध्ये शिवसेनेबरोबर गेलात. मग भाजप का चालत नाही? असा हा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना सोयीस्कररीत्या सांगितले जात असल्याबाबत देखील अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईतील के. सी. काॅलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करणारे पाच माजी आमदार आहेत. माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, तिलोत्तमा पाटील यांनी हा प्रवेश केला.

Ajit Pawar Sharad Pawar BJP
Ram Shinde BJP : 'हमारे अंदर 'राम' भी है, और 'रावण' भी'! भाजपच्या राम शिंदेंच्या पोस्टचा अर्थ काय?

अजित पवार यांनी 'एनडीए'मध्ये जायचा निर्णय घेतल्याचे सांगताना, वेगळं काही केलं नाही. कारण 2019 मध्ये शिवसेनेबरोबर (Shivsena) जाण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला शिवसेनेबरोबर जायला चालते. मग भाजप का चालत नाही? आम्ही 'एनडीए'बरोबर जाताच, पुढं कार्यकर्त्यांना सोयीस्कररीत्या सांगितलं गेलं, यावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar Sharad Pawar BJP
India Vs Pakistan : दिल्लीत बसलेल्या 'दोघांची' पाकिस्तानला धडकी; 6 मुद्द्यांमुळे युद्धाआधीच फुटलाय घाम

शिवसेना चालते, तर मग भाजप का चालत नाही, असा प्रश्न शरद पवार यांना करताना, उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर आम्ही सर्व आमदारांनी वरिष्ठांना सांगितले होते की, आपण सत्तेत सहभागी होऊ. मी सत्तेसाठी हपापलेला नाही. मी सगळ्यात जास्त सत्ता उपभोगली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजितदादांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताना, पक्षाचा अध्यक्ष म्हणून कोणाबरोबर देखील भेदभाव करणार नाही. ज्याच्यामध्ये नेतृत्व दिसेल, त्या सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यांना संधी देणार आहे. राजकारणात कुणीच कोणाचे कायमच मित्र किंवा शत्रू नसते, असे सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांना अजितदादांनी विचारलेल्या प्रश्नावर काय प्रत्युत्तर येते, याकडे आता लक्ष असणार आहे. परंतु अलीकडच्या काळात शरद पवार आणि अजित पवार यांच्या घरगुती कार्यक्रमानिमित्ताने गाठीभेटी वाढल्या होत्या. या भेटी चर्चेत देखील आल्या होत्या. यातून राष्ट्रवादी एक होईल, अशी चर्चा देखील सुरू झाली होती. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी तशी अपेक्षा देखील व्यक्त केली होती. पण अजितदादांच्या या प्रश्नानंतर आता तसे काही होईल, असे वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com