
Sujay Vikhe political statement : राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
पण तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केली. त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. एकनाथ शिंदेसाहेब गुवाहाटीला गेले अन् आमचे जोरदार राजकीय 'कमबॅक' झालं, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
भाजपचे अहिल्यानगरमधील माजी खासदार सुजय विखे यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, पडद्याआड गेलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला निघून गेल्याचा संदर्भावर देखील सुजय विखे यांनी भाष्य केले.
सुजय विखे यांनी 2019मध्ये खासदारकी लढवायची होती. काँग्रेसकडून तशी तयारी होती. परंतु तिकीट वाटपात त्यांना संधी मिळाली नाही. लोकसभा 2019च्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महाआघाडी तिकीट वाटपाच्या बैठका विखे पाटलांच्या घरी होत होत्या. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे विरोधी पक्षनेते होते. खासदारकीचे सर्व्हेत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून नाव आघाडीवर होते, असा दावा 'सरकारनामा'शी बोलताना सुजय विखे पाटलांनी केला.
राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विखे पाटील परिवाराची राजकीय दिशा बदलली आणि ते भाजपमध्ये गेले. आता अहिल्यानगरमध्ये भाजप संघटनेवर विखे पाटील यांची मजबूत पकड आहे. परंतु 2019मध्ये सुजय विखे पाटील भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. परंतु राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. यामुळे सुजय विखे पाटलांचा निर्णय चुकीचा झाला, यावरून अनेकजण डिवचत होते. वडिलांना देखील काही नेते बोलून दाखवत होते, अशी माहिती सुजय विखे पाटलांनी स्वतः 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
राजकारणात टायमिंगला आणि त्याचवेळी घेतलेल्या निर्णयाला महत्त्व असते. वडील आमदार, तर मी खासदार होतो. परंतु निर्णय चुकला, असे सर्वच म्हणू लागले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षे गेली. त्यादरम्यान आमचा निर्णय चुकल्याचे बोलले गेले. मात्र एकनाथ शिंदेसाहेब गुवाहाटीला गेले अन् आमचे जोरदार कमबॅक झाले. आता जे नावं ठेवत होते, निर्णय चुकाचा झाल्याचे म्हणत होते, तेच आता म्हणतात की सुजयसारखा योग्य निर्णय घेणारा मुलगा नाही, विखे पाटील परिवाराचा निर्णय योग्यच ठरला, असे सांगत असल्याचे सुजय विखे पाटलांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.