
तळ कोकणातील वाळू प्रश्न आता सिंधुदुर्गातही गाजत असून वैभव नाईक आक्रमक झाले.
वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर वाळू माफियाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधीच या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Sindhudurg News : तळ कोकणात सध्या वाळूचा मुद्दा चांगलाच तापत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तो उचलून धरला आहे. नुकताच या मुद्द्यावरून माजी मंत्री तथा आमदार अनिल परब यांनी अधिवेशन गाजवले होते. त्यांनी या मुद्द्यावरून राज्य महसूलमंत्री योगेश कदम यांना टार्गेट केले होते. तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता हाच मुद्दा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील उचल खाताना दिसत आहे. येथे उद्धव ठाकरे यांचे शिलेदार माजी आमदार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. तर वाळु माफीया हे राणे कुटुंबाच्या जवळचे असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे आगामी स्थानिकच्या आधीच रणधुमाळी सुरू झाल्याची चर्चा आहे.
वैभव नाईक यांनी, आता नितेश राणे सत्ताधारी पक्षात आहेत. ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे आपली छबी स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त घोषणा करताना दिसत आहे. पण त्यांचेच भाऊ आमदार निलेश राणे यांच्याबरोबर कोण असतात जरा एकदा त्यांनी पाहावं. कधी काळी जी वाळू माफिया नितेश राणेंबरोबर फिरायचीत तीच आता निलेश राणेंबर दिसत आहेत. त्यामुळे वाळु माफीया हे राणे कुटुंबाच्या जवळचे आहेत. त्यांना सत्ताधाऱ्यांची फुस आहे असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
याच वाळू माफियांचा वापर राणे कुटुंबाने मते घेण्यासाठी यंत्रणा लावण्यासाठी करून घेतला. पण आता वापर झाल्यानंतर आपला आणि त्यांचा काहीच संबंध नसल्या सारखी भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र त्यांचे भाऊ आमदार निलेश राणे यांची भूमिका काय? आज कुडाळ मालवण आणि वेगुर्लेतील वाळू माफियांचा राणे कुटुंबाबरोबर वावर होताना दिसतो. त्या वाळू माफियांची नावे उघड केल्यास ती भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या जवळचे असल्याचे समोर येईल असाही दावा त्यांनी केला आहे.
पालकमंत्री वाळू माफियांवर कारवाई करू अशी घोषणा करत आहेत. मात्र जिल्ह्यात राजरोसपणे वाळूचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. या वाळू माफियांची हिमंत तर पाहा की त्यांनी कुडाळच्या एका तहसिलदारावर गाडी घातली. ही हिंमत सत्ताधारी पक्ष किंवा नेत्यांचे पाठवळ असल्याशिवाय येत नाही.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. मात्र जिल्ह्यात अशी कारवाई होताना दिसत नाही. कुठे तरी वाळू उत्खन्नाचा रॅम्प तोडला जातो. कोणालातरी नोटीस देण्यापुर्ती कारवाई केली जाते. परंतू एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्ह्यात एकही कारवाई झालेली नाही. पण जर अशी कारवाई झालीच तर आम्ही पालकमंत्र्यांना मानू असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
प्र.1: वैभव नाईक यांनी कोणावर आरोप केला?
उ.1: त्यांनी राणे कुटुंबावर वाळू माफियाशी संबंध असल्याचा आरोप केला.
प्र.2: या आधी वाळू प्रश्न कोणत्या आमदाराने मांडला होता?
उ.2: माजी मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलला होता.
प्र.3: सिंधुदुर्गात हा मुद्दा का गाजतोय?
उ.3: आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाळू माफियाचा मुद्दा राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.