Ahilyanagar DJ Ban : डीजेवर अहिल्यानगर प्रशासनाचा दणका; पाथर्डीत स्टेटसवरून 53 जणांवर गुन्हा

Ahilyanagar bans DJ-Dolby systems during festivals as sound-related cases rise : गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत मिरवणुकीतील डॉल्बीवर बंदी; श्रीरामपुरात कर्णकर्कश साउंड सिस्टमप्रकरणी दोघांवर कारवाई
Ahilyanagar DJ Ban
Ahilyanagar DJ BanSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Ganeshotsav 2026 : सण-उत्सवाचा काळात डीजे आवाज हा राज्यात कळीचा मुद्दा ठरला आहे. डाॅल्बी अन् डीजेच्या आजावाचे दुष्परिणामांवर समोर येऊन खुली चर्चा होत आहेत. यातून उत्सवकाळात डीजे अन् डाॅल्बी सिस्टमवर बंदीची मागणी होऊ लागली आहे. जनसामान्यांच्या या मागणीचा दबाव सरकार अन् प्रशासनावर वाढला आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने गणेश स्थापना, गणेश विसर्जन, घटस्थापना ते दसरा सणाच्या कालावधीत मिरवणुकीतील डाॅल्बीवर बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासन एकीकडे हा निर्णय घेत असताना, साऊंड सिस्टमवरून जिल्ह्यात वेगळ्याच घटना समोर आल्या आहेत. पाथर्डी डीजेच्या स्टेटसवरून दोन गटात मारामारीप्रकरणी आठ महिलांसह53 जणांविरोधात, तर श्रीरामपूरमध्ये कर्णकर्कश साउंड सिस्टीमवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर (Ahilyanagar Collector) जिल्हा प्रशासनाचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी, सण-उत्सव काळात डाॅल्बीवर बंदीचा आदेश जारी केला आहे. डॉल्बी साउंड सिस्टिम आणि उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरामुळे ध्वनीप्रदूषण होऊन वृद्ध व्यक्ती, रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, हा बंदीचा आदेश जारी करण्यात आल्याचे दादासाहेब गीते यांनी म्हटले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 223 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहे. या आदेशानुसार अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण भागात डॉल्बी सिस्टीम वापरावर बंदी असणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर (Shrirampur) आणि पाथर्डी येथे साऊंड सिस्टमवरून वाद झाल्याचे समोर आले आहे.

कर्णकर्कश आवाजाचा साउंड सिस्टीम

श्रीरामपूरमध्ये गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कर्णकर्कश आवाजात साउंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी एका मंडळाच्या अल्पवयीन अध्यक्षासह साउंड सिस्टीमचे मालक नीलेश दगडू पाटील यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. साउंड सिस्टीम जप्त करण्यात आला असून, आरटीओमार्फत मालकाला 15 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

Ahilyanagar DJ Ban
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची भाषा महायुतीला खटकली; मराठवाडी लहेजा ठरतोय नवा संघर्षबिंदू

डीजेच्या स्टेटसवरून 53 जणांविरोधात गुन्हा

पाथर्डीत सोशल मीडियावर ठेवलेल्या डीजेच्या स्टेटसवरून दोन गटांत मारामारी झाली. ही घटना तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. एकूण 53 जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीमध्ये आठ महिलांचाही समावेश आहे.

दांडके, लोखंडी गजाने मारामारी

पोळा सणाच्या दिवशी गावात डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे स्टेटस काहींनी सोशल मीडियावर ठेवले. त्यामुळे दोन गटांत वाद निर्माण झाला. गावातील मंदिराजवळ, तसेच झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावर दोन्ही गट आमनेसामने आले आणि हाणामारी झाली. रामदास शंकर काकडे यांच्या फिर्यादीनुसार 26, तर दुसरी फिर्याद सुनील विनायक दौंडी यांच्या फिर्यादीत 27 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत लाकडी दांडके, लोखंडी गजाचा वापर करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शांतता कमिटीच्या बैठकीत शांतता भारी

संगमनेर शहरात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता कमिटीची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत अनेकदा विविध मुद्द्यांवरून खडाजंगी होत असल्याचे चित्र पहायला मिळते. मात्र, यंदा प्रथमच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेली शांतता कमिटीची बैठक शांततेत पार पडली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांना गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com