Sujay Vikhe ADCC Bank Chairman : सुजय विखे अध्यक्षपदी, खासदार लंके विरोधात; दोघांनीही दंड थोपटले! लोकसभेचा हिशेब जिल्हा बँकेत चुकता होणार?

Sujay Vikhe Patil becomes Ahilyanagar DCC Bank chairman while MP Nilesh Lanke sits in opposition. Will their Lok Sabha rivalry intensify bank? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड; विखे अध्यक्षपदी विराजमान होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष, खासदार नीलेश लंके विरोधी बाकावर.
Sujay Vikhe ADCC Bank Chairman
Sujay Vikhe ADCC Bank ChairmanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष करताना, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दंड थोपटले. बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी देखील दंड थोपटले होते.

विखे पाटील-खासदार लंके, या दोघेही राजकीय प्रतिस्पर्धींनी जिल्हा बँकेत दमदार एन्ट्री चर्चेत आहे. यातच दोघांमधील आगामी राजकीय संघर्ष देखील तीव्र असणार असल्याचे संकेत, या दोघांनी दंड थोपटण्यातून दिलेत.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची आज निवड झाली. सुजय विखे पाटील अध्यक्ष, तर बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसने बँकेत सत्ता मिळवत, पद देखील आपल्याकडेच ठेवली. या निवडीबरोबरच जिल्हा बँकेत आता उत्तर नगर जिल्ह्याचा दबदबा पुन्हा एकदा निश्चित झाला.

अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच, माजी खासदार विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावर गुलाल उधळत, फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) स्वतः यात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेताच, गुलालात न्हाऊन गेले होते. याच वेळी त्यांनी दंड थोपटले. एकदा सोडून, तीन ते चार वेळा त्यांनी दंड थोपटले. विखे पाटलांच्या या कृतीने कार्यकर्त्यांचा जल्लोष आणखीनच वाढला. त्याचवेळी खासदार नीलेश लंके यांनी विजयानंतर थोपटलेल्या दंडांची आठवण झाली.

Sujay Vikhe ADCC Bank Chairman
Ahilyanagar DCC Bank Chairman Election : विखेंना अध्यक्षपद हवंय, थोरातांकडे संख्याबळ; लंके मैदानात उतरले तर जिल्हा बँकेचा खेळ फिरणार?

जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात खासदार नीलेश लंके यांच्याविरोधात विखे पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते, राहुल शिंदे मैदानात होते. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. खासदार लंकेंनी निवडणुकीत विजय मिळवताच, जल्लोषावेळी दंड थोपटले होते. आणि संघर्षाला तयार असल्याचे सूचक संकेत दिले होते.

Sujay Vikhe ADCC Bank Chairman
Ahilyanagar DCC Bank Chairman Election : सुजय विखेंच्या अध्यक्षपदासाठी मंत्री विखे पाटलांची जुळवाजुळव? राम शिंदेंच्या भेटीमागे जिल्हा बँकेचे गणित!

लंके-विखे जिल्हा बँकेत आमने-सामने

सुजय विखे पाटलांची जिल्हा बँकेत सुरूवातीलाच एन्ट्री झाली होती. बिनविरोध झालेल्या दहा जागांमध्ये त्यांचा समावेश होता. खासदार लंके निवडणुकीला समोरे जात बँकेत एन्ट्री घेतली आहे. विशेष म्हणजे, विखे पाटलांचे कट्टर समर्थकाला पराभूत करून, ते बँकेत दाखल झाले आहेत. जिल्हा बँकेत आता दोघे आमने-सामने असणार आहे. सुजय विखे पाटील अध्यक्षपदी विराजमान होत, सत्ता चालवणार आहे, तर खासदार लंके हे विरोधात बसून कामकाज करणार आहेत. यामुळे दोघांमधला राजकीय संघर्ष कायम राहणार आहे.

विखे-लंके दंड थोपटतच राहणार......

लोकसभा निवडणुकीत नीलेश लंकेंकडून सुजय विखे पाटील यांना पराभव पत्कारावा लागला होता. विखे पाटील यांना या पराभवाचे शल्य कायमस्वरूपी आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष जिल्हा बँकेपर्यंत येऊन ठेपला आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील हे दोघे नेते प्रचारात आमने-सामने येत, एकमेकांविरोधात दंड थोपटतानाच दिसतील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.