Ahilyanagar DCC Bank chairman : जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? फडणवीसांच्या दरबारात विखे, कोल्हे, राजळेंची परीक्षा; काळे-गडाखही शर्यतीत!

Ahilyanagar DCC Bank chairman? Devendra Fadnavis final call as Sujay Vikhe, Monika Rajale, Bipin Kolhe, Ashutosh Kale and Shankarrao Gadakh emerge contenders : सुजय विखे पाटलांनी अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवला; 12 नोव्हेंबरला सत्तेचा फैसला, 68 वर्षांत पहिल्यांदाच महिला अध्यक्ष होणार?
Ahilyanagar DCC Bank chairman
Ahilyanagar DCC Bank chairmanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवतील, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठासून सांगितले आहे. त्यामुळे बँकेत भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून भाजप व्यतिरिक्त अन्य पक्षांच्या संचालकांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.

मात्र, भाजपचे 8 संचालक असल्याने यापैकी कोणाला संधी मिळते की मुख्यमंत्री उदार मनाने हे अध्यक्षपद अजित पवार राष्ट्रवादी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला बहाल करतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडाळाची पहिली बैठक 12 नोव्हेंबरला आयोजित केली असून, त्याचवेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष तथा उपाध्यक्षपदाचा फैसला होणार आहे.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आमदार मोनिका राजळे, डॉ. सुजय विखे पाटील व बिपीन कोल्हे, असे तीन भाजपचे (BJP) संचालक, अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख, अशी पाच नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे ते भाजपचा अध्यक्ष करणार की अजित पवार राष्ट्रवादीचा की शिवसेना ठाकरे पक्षाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.

दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) 68 वर्षांच्या इतिहासात अद्याप एकाही महिलेला अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळालेली नाही. यंदाच्या संचालक मंडळात तब्बल 6 महिला आहेत. त्यामुळे यंदा महिलेला संधी मिळते का, याचेही कुतूहल आहे. तसेच यंदापासून अडीच-अडीच वर्षे संधीचे वाटपही विचाराधीन असल्याचे समजते. त्यामुळे त्याचे अधिकृत स्पष्टीकरणही येत्या काही दिवसात अपेक्षित आहे.

Ahilyanagar DCC Bank chairman
Ahilyanagar DCC Bank Election Final Result : जिल्हा बँकेत विखे-थोरात 'सहमती'चा दबदबा! 21 पैकी 17 जागा जिंकल्या; राम शिंदे-लंकेच्या एन्ट्रीने राजकारणाला नवे वळण

जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक नुकतीच उत्साहात झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी लोकसभा निवडणुकीत झालेला चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव विसरून व दुसरीकडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा निवडणुकीत आपला स्वतःचा झालेला पराभव विसरून जिल्हा बँकेत राजकारण नको असे सांगत सहमती एक्स्प्रेस राबवली.

Ahilyanagar DCC Bank chairman
Ahilyanagar DCC Bank Chairman Election : संख्याबळ थोरातांचे, अध्यक्षपदाचा रिमोट फडणवीसांच्या हाती? सुजय विखेंच्या विधानाने जिल्हा बँकेत नवा ट्विस्ट!

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही दुष्काळी स्थितीमुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तिला प्रतिसाद देताना विखे पाटील-थोरातांनी एकत्र येत सहकार विकास पॅनेल तयार केले. या पॅनेलने बिनविरोध झालेल्या 11 पैकी 10 जागा जिंकल्या व निवडणूक झालेल्या 10 जागांपैकी 7 जागा जिंकल्या. त्यानंतर स्वतंत्र लढलेल्या संजीवनी शिंदे-गायकर यांनीही पाठिंबा दिल्याने विखे पाटील-थोरात गटाचे आता 18 संचालक झाले आहेत.

विरोधात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे दोन समर्थक व खासदार नीलेश लंके असे तिघेच आहेत. विखे पाटील-थोरात पॅनेलमधील विजयी संचालकांपैकी 13 संचालक थोरातांचे व 5 संचालक विखेंचे आहेत. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत हे 18 संचालक आहेत. निवडून आलेल्या 21 संचालकांमध्ये भाजपचे 8, काँग्रेसचे 5, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे 5, ठाकरे सेनेचे दोन व शरद पवार राष्ट्रवादीचा एक संचालक आहेत.

जुने-नवे संचालक

बँकेच्या संचालक मंडळात आता नव्या व जुन्यांचा संगम झाला आहे. मोनिका राजळे, बिपीन कोल्हे, अक्षय कर्डिले, शंकरराव गडाख, करण ससाणे, दत्ता पानसरे, अनुराधा नागवडे, आशुतोष काळे, वैभव पिचड व गणपत सांगळे हे 10जण जुने संचालक आहेत. ते याआधीही बँकेच्या संचालक मंडळात होते. नव्याने 11जण संचालक झाले आहेत. त्यात डॉ. सुजय विखे पाटील, राजश्री घुले, सचिन घुमरे, सचिन जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, खासदार नीलेश लंके, संजीवनी शिंदे-गायकर, ज्योती शिंदे, संगीता वाघ, कारभारी जावळे व रणजित देशमुख यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.