Ahilyanagar DCC Bank Election : विखे पाटील-घोगरे वाद आता हायकोर्टात? जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही अर्जांवर मोठा निर्णय

Sujay Vikhe nomination cleared, while Eknath Ghogre plans legal challenge : विखेंविरोधातील हरकत फेटाळली; घोगरेंचा अर्जही बाद! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचा वाद आता हायकोर्टात?
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणुकीच्या मैदानात उतरलेले भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांना न्यायालयात खेचण्याची तयारी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी तयारी केली आहे.

विखे पाटील यांच्या विरोधात दाखल केलेली हरकत फेटाळणे अन् घोगरेंबाबत यांच्या अर्जावरील सूचकाच्या सहीवरून अर्ज नामंजूर करणे या दोन्ही मुद्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची तयारी घोगरे अन् त्यांचे वकील सुरेश लगड यांनी सांगितले.

सेवा सोसायटीच्या राहाता मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) आणि त्यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती नोंदवल्या होत्या. विखे पाटील राहुरी कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले असून, त्याची परतफेड केलेली नाही, अशी हरकत घोगरे यांनी घेतली होती.

एकनाथ घोगरे यांच्या अर्जावर स्वाक्षरी आपली नसल्याचे सुचकाने नाकारले. त्यानंतर त्याचा 'इन कॅमरा' जबाब नोंदवण्यात आला. हरकतींवरील सुनावणीनंतर, एकनाथ घोगरे यांनी विखे पाटील यांच्याविरोधात घेतलेली हरकत फेटाळण्यात आली. तसेच घोगरे यांच्या अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. या दोन्ही निकालांविरोधात उच्च न्यायालयात (High Court) धाव घेण्याची तयारी एकनाथ घोगरे यांनी केली आहे.

Sujay Vikhe
Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांची उमेदवारी धोक्यात? विखे-राजळेंसह थोरातांच्या जावयाचीही परीक्षा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिवसभर प्रतीक्षा करून निकालाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप घोगरे यांची वकील सुरेश लगड यांनी केला. यावरून जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक उच्च न्यायालयात जाणार असल्याचे चित्र आहे.

Sujay Vikhe
Vikhe Thorat ADCC Bank seat sharing : अहिल्यानगर जिल्हा बँकेचा आज फैसला; 7 जागांवर विखे-थोरातांचा तिढा, जगतापांची भूमिका निर्णायक?

थोरातांचे जावई देशमुख बिनविरोध

दरम्यान, जिल्हा बँकेत 21 जागांपैकी दोन जागा बिनविरोधात जवळपास शिक्कामोर्तब झाला. तर आणखी तीन जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांची पहिली जागा बिनविरोध झाली. काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांचा देखील बिनविरोध होण्यात समावेश झाला आहे.

हे बिनविरोध होण्याच्या मार्गावर

भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील, अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले किंवा त्यांची पत्नी राजश्री, भाजपचे आमदार विवेक कोल्हे किंवा त्यांचे वडील बिपीन कोल्हे हे बिनविरोध निवड होण्याच्या मार्गावर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com