Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांची उमेदवारी धोक्यात? विखे-राजळेंसह थोरातांच्या जावयाचीही परीक्षा

Nomination objections put several political heavyweights under scrutiny ahead of the Ahilyanagar District Bank election : सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि रणजीतसिंह देशमुख यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेतले; आज सकाळी 11 वाजता छाननीचा निकाल
Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननीसाठी दिग्गजांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील, भाजप आमदार मोनिका राजळे, अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डाॅ. प्रणोती या प्रमुखांच्या उमेदवारी, तर विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनीही आपल्या प्रतिस्पर्धींच्या अर्जांवर हरकती घेतल्या. छाननी व हरकतींवर आज बुधवारी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांच्या विरोधात एकनाथ घोगरे यांनी हरकत घेतली. घोगरे यांच्या वतीने ॲड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली. विखे पाटील यांनी राहुरी कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले असून, ते परतफेड केलेले नाही. ते थकबाकीदार आहेत, अशी हरकत घोगरेंनी घेतली. विखे पाटील यांनी कर्जच घेतले नसल्याचा युक्तिवाद केला. एकनाथ घोगरे यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचकाने आपली स्वाक्षरी असल्याचे नाकारले. यानंतर त्याचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला.

भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी कडूनचंद शेटे यांनी हरकत नोंदवली. आमदार राजळे वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या थकबाकीदार आहेत. यासह इतर दोन हरकती कडूचंद शेटे यांनी घेतल्या होत्या. इतर हरकतींवर सुनावणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC Bank Election : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विश्वासात घेतले नाही? बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनी त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवार चित्रा गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. गायकवाड यांच्या सूचकाने अर्जावरील सही आपली नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले. याचा फैसला आज दिला जाणार आहे. रणजीतसिंह देशमुख यांनी निवडणूक जवळपास बिनविरोध मानली जात आहे.

Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC Bank President : अहिल्यानगर जिल्हा बँकेत सुजय विखेंची एंट्री; अध्यक्षपदाची चर्चा, बिनविरोध फॉर्म्युल्यावर ठरणार फैसला

गडाखांपाठोपाठ घुले, देशमुख बिनविरोधच्या मार्गावर

जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 2 नोव्हेंबरला मतदान होत आहे. 3 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. पण बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दिग्गजांचे प्रयत्न आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज असल्याने, त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. शेवगावमधून बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले हे देखील बिनविरोधचा उंबरठ्यावर उभे आहेत.

बिनविरोधासाठी कस लागणार

इतर जागांवर मात्र दोन-तीन दिग्गज किंवा अधिक उमेदवार आहेत. त्यामुळे एखाद्याला बिनविरोध निवडून येण्यासाठी इतरांची मनधरणी करावी लागणार आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यात येणार असल्याने छाननीनंतर सुमारे 15 दिवसांचा कालावधी माघारीसाठी आहे. त्यामुळे या काळात कोणाची ‘मनधरणी’ कोण व कशी करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com