Ahilyanagar DCC Bank: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहिला बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, माजी मंत्री गडाखांनी ताकद दाखवली

DCC Bank Election 2026: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.
Ahilyanagar DCC Bank .jpg
Ahilyanagar DCC Bank .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.ही निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. याचदरम्यान,अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहिला बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवड होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एकीकडे अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र,अशातच या निवडणुकीसाठी तब्बल ३६९ ते ५३१ पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात माजी खासदार सुजय विखे पाटील, विद्यमान आमदार मोनिका राजळे, अक्षय कर्डिले हेही आदी नेते रिंगणात आहेत.

नेवासा तालुक्यातील सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये बँकेच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. याचदरम्यान, नेवासा तालुक्यात मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज राहिल्यानं त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahilyanagar DCC Bank .jpg
BJP News: भाजपचा संघटनात्मक मोठा निर्णय; 'कृष्णराज'नंतर मराठवाड्यातील 'युवती'वर मोठी जबाबदारी, युवा मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीत कोणाला मिळाली संधी..?

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी हा निर्णय जाहीर करताना कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे हा निर्णय घेतलेला नसून,घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com