Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू! ऑगस्टमध्ये रंगणार मोठा राजकीय सामना

Resolution process begins till July 16; political activity intensifies ahead of Ahilyanagar District Cooperative Bank elections : अहिल्यानगर मधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक मतदानासाठी ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एका मतदारसंघात 5 हजारांहून अधिक मतदार असणार आहेत.
Ahilyanagar DCC Bank Election
Ahilyanagar DCC Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar District Cooperative Bank Election : अहिल्यानगरमधील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक अर्थात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव आजपासून 16 जुलैपर्यंत मागवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संभाजी निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश सुरवसे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मतदानासाठी (Voting) आवश्यक असलेल्या प्रतिनिधींचे ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने ऑगस्ट महिन्यात निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्हा सहकारी बँकेच्या (Cooperative Bank) विद्यमान संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आली होती. त्यानंतर सुरुवातीला एक सदस्यीय प्रशासक नेमण्यात आला आणि नंतर तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळाकडे बँकेची सूत्रे देण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत विविध मतदारसंघांमधून सुमारे 5 ते साडेपाच हजार मतदार मतदान करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा बँकेकडून तब्बल 15 लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.

Ahilyanagar DCC Bank Election
Shiv Sena UBT MP : ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराला बक्षीस? एकनाथ शिंदेंचा ‘मास्टरप्लॅन’ काय, मंत्रिपदाची ऑफर चर्चेत!

निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त अशाच सहकारी संस्थांना मिळणार आहे ज्या 1 जून 2023 किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद झालेल्या आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था वगळता इतर कोणतीही संस्था थकबाकीत असल्यास त्या संस्थेच्या प्रतिनिधींना मतदान करता येणार नाही.

Ahilyanagar DCC Bank Election
Arvind Sawant Letter : महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’वरून नवा स्फोट; शिवसेना ठाकरे पक्षानं दिल्लीत टाकला डाव!

महत्त्वाची बाब म्हणजे जर एखादी प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था थकबाकीत असेल, तर त्या संस्थेच्या संचालकांऐवजी थकबाकीदार नसलेल्या सदस्याला प्रतिनिधी म्हणून निवडण्याचा ठराव करता येणार आहे. तसेच ज्या संस्थांवर 73 (क) (अ) (1) (i) (फ) (iii) या तरतुदीनुसार कारवाई झालेली आहे, अशा संस्थांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

सभासद संस्थांनी प्रतिनिधींचे ठराव संबंधित जिल्ह्यातील उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात 17 जून ते 16 जुलै या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. याच कालावधीत संस्थांनी प्रतिनिधी निवडीचे ठराव मंजूर करणे आवश्यक राहणार आहे. या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, सहकार क्षेत्रातील सत्ता आणि स्थानिक राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी ही निवडणूक ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com