Kala Kendra vandalism
Kala Kendra vandalismSarkarnama

Kala Kendra Jamkhed : भगव्या उपरण्यांमागे तोंड लपवली, हातात तलवारी अन्..; कला केंद्रावर सलग तीन दिवसांपासून टारगटांचा राडा

Youths Create Chaos at Kala Kendra in Jamkhed, Ahilyanagar — Harassment and Vandalism Reported : अहिल्यानगरच्या जामखेड इथं कला केंद्रावर गेल्या तीन दिवसांपासून टारगट उच्छाद घालत असून, कला केंद्रावरील मुलींची-महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी आहेत.
Published on

Ahilyanagar Jamkhed incident : तोंड भगव्या उपरण्यांमागे लपवत 20 ते 3 जणांच्या टारगट टोळक्यांनी जामखेडमधील कला केंद्रावर चांगलाच राडा घालत आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे प्रकार सुरू आहेत. कला केंद्रावरील मुली-महिलांची छेड काढण्यापासून ते वाहनांची तोडफोडीपर्यंत प्रकार सुरू आहे.

या टारगट गुरूवारी रात्री अचानक हल्ला केला. हातात तलवारी, कोयते, दांडके, लोखंडी राॅड, फायटर घालून ही दहशत माजवत आहे. त्यामुळे जामखेडमधील कला केंद्र गेल्या टारगटांच्या दहशतीखाली आली आहेत. काल रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची 20 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

जामखेड कला केंद्रावर गेल्या तीन दिवसापूर्वी मुलींची छेडछाड झाली. हे प्रकरण पुढे मारहाणीपर्यंत गेले. पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला. यानंतर जामखेडमधील कला केंद्रावर गुरूवारी रात्री टारगटांनी हल्ला केला. या प्रकरणातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी तोंड लपवण्यासाठी भगव्या उपरण्यांचा वापर केला. बहुतांशी हल्लेखोरांनी तोंड भगव्या उपरण्यांमागे लपवली होती. त्यामुळे हे हल्लेखोर कोणत्या राजकीय संघटनेची निगडीत आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

जामखेड तालुक्यातील मोहात रेणुका कला केंद्रात टारगटांचा हा धिंगाणा हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. टारगटांने दहशत माजविताना हातात, तलवारी घेऊन फिरत होते. काहींच्या हातात कोयते, फायटर, लाकडी दांडगे, गज होते. समोर जे वाहन दिसेल, ते फोडत होते. कला केंद्रामधील साहित्याची या टारगटांनी चांगलीच नासधूस केली. यात काही मुली आणि महिलांची (Women) छेडछाड झाली. हे टारगट त्यांच्या अंगावर धावून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

Kala Kendra vandalism
Congress MLA betting scam : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराचा ऑनलाईन बेटिंग प्रकरणात 2000 कोटींचा व्यवहार; परदेशापर्यंत नेटवर्क

या टारगटांना स्थानिक राजकीय नेत्यांचं बळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांत गुन्हा दाखल होऊन देखील कितपत कारवाई होईल, टारगट खरच निष्पन्न होतील का? अशी चर्चा जामखेडमध्ये आहे. हल्लेखोर पूर्वनियोजन करून आली होती. येताना ते चारचाकी वाहनातून आली. 20 मिनिटे रेणुका कला केंद्रावर राडा घातल्यानंतर हल्लेखोर टारगट बीडच्या दिशेने पसार झाली.

Kala Kendra vandalism
Political Horoscope: राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी! विश्वासघाताचे राजकारण; मोठे पक्ष फुटण्याची शक्यता

हा चिंग्या कोण?

विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच रेणुका कला केंद्रावर टारगटांनी उच्छाद घातला होता. आता पुन्हा गुरूवारी रात्र धिंगाणा घालताना, टारगटांनी 'कोल्हाटी खूप माजलेत चिंग्याच्या नादी लागू नका, त्याचा परिणाम भोगावा लागेल', अशी दमबाजी करत निघून गेले. ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून धुडगूस घालणाऱ्या टारगटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारी रवींद्र वाघ गुन्ह्याचा तपास करत आहे. दरम्यान, हे टारगट पुन्हा हल्ला करतील, अशी भीती कला केंद्रावर काम करणाऱ्या मुली-महिलांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com