Ashutosh Kale NCP controversy : आंदोलकांची शेरेबाजी, अजितदादाच्या शिलेदाराच्या जिव्हारी; 'तीन हजार कोटी, रस्त्यावर बोटी', 'आमदार काळे, रस्त्यावर तळे'

Ahilyanagar Kopargaon Youth Protest Over Bad Roads, Criticize NCP Ashutosh Kale : कोपरगाव शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवर स्थानिक नागरिकांनी अनोखे आंदोलन करताना आमदार आशुतोष काळे यांच्या कारभारावर निशाणा साधला.
Ashutosh Kale NCP controversy
Ashutosh Kale NCP controversySarkarnama
Published on
Updated on

Kopargaon bad roads issue : कोपरगावमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवर स्थानिक नागरिक आणि युवक चांगलेच आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांना झोंबेल, अशी आंदोलकांनी शेरेबाजी केली.

'तीन हजार कोटी, रस्त्यावर बोटी...', 'आमदार काळे, रस्त्यावर तळे...', अशा शेरेबाजीने आंदोलकांनी आमदार काळेंना टार्गेट केले. आंदोलकांच्या या शेरेबाजीवर आमदार काळे यांच्याकडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुरावस्थेचा बाजारपेठेवर देखील परिणाम झाला आहे. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील रस्त्यांची कामे मार्गी लागली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

या पावसात कोपरगाव शहरातील अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांना पायी चालताना देखील वाट काढणे मुश्लिक होत आहे. या सर्वांचा संताप युवकांनी आंदोलन करत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आशुतोष काळे यांना आंदोलकांनी टार्गेट केले. रस्त्यांवर साचलेल्या खड्ड्यांमधील पाण्यात होडी सोडून त्यात आंदोलकांनी बसून निषेध केला.

Ashutosh Kale NCP controversy
Ahilyanagar cow meat incident : दोन मुलांकडून रस्त्यावर गोवंशीय मांस फेकणारा पोलिसांकडून गजाआड; आयुक्तांसह निम्मी मनपा 'फिल्ड'वर!

आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. 'तीन हजार कोटी, रस्त्यावर बोटी', 'आमदार काळे, रस्त्यावर तळे', अशा घोषणा देत युवक आंदोलकांनी रस्त्यांची झालेली दुरावस्थेकडे लक्ष वेधले. आमदार काळे यांनी कोपरगावमधील रस्त्यांसाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला होता. त्याचा संदर्भ घेत आंदोलकांनी जोरदार शेरेबाजी केली.

Ashutosh Kale NCP controversy
Maharashtra local body elections : 'स्थानिक'च्या निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाणार? गायकवाड, अहिर अन् देशपांडेंना मतदार याद्यांमध्ये घोळाची भीती

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यांमध्ये कागदी होड्या सोडत, 'तीन हजार कोटी, प्रवासाला बोटी', 'आमदार काळे, रस्त्यावर तळे', अशा उपरोधिक घोषणा दिल्या. होड्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला पडलेल्या खड्ड्यात बसून होड्या सोडत एका प्रतिकात्मक मोठ्या होडीवर उपरोधिक संदेश लिहित जोरदार शेरेबाजी केली.

कोपरगावमध्ये विकासाच्या गप्पा मोठ्या, पण नागरिकांना रस्त्यावर बोट चालवण्याची वेळ आली आहे. मोठ्या पर्यटनस्थळी जाण्याची गरज आम्हाला राहिली नसून शहरातच चौका चौकात साचलेल्या तळ्यांमध्ये नौका विहाराचा आनंद आम्ही घेतो, अशी शेरेबाजी करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. आंदोलकांनी केलेल्या अनोख्या निषेधामुळे आमदार आणि प्रशासन, रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल घेणार का? रस्त्यांवरील खड्ड्यांतच कोपरगांवकरांचा पुढील काळात जाणार, हा प्रश्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com