
Maharashtra Politics : छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने छळ करत कशी क्रुर पद्दतीने हत्या केली ते 'छावा' चित्रपटातून बघितल्यानंतर औरंगजेबवरचा हिंदूंचा राग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. त्यानंतर महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी होत आहे. अशातच आता कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संभाजी महाराज यांच्या हत्येवरुन केलेल्या खळबळजनक दाव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले. नागपूरात याप्रकरणावरुन मोठा हिंसाचार झाला. त्याच परिस्थितीची पाहणी करायला आज नागपूरात आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगजेबने संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं व त्यांना कसं मारावं हे पंडितांनी सांगितलं असा खळबळजनक आरोप दलवाई यांनी केला.
दलवाई हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरा औरंगजेबाचाही इतिहास वाचावा असा सल्ला दिला. ते म्हणाले, औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ती क्रुरता होती.
पण औरंजेबाने त्याचा भाऊ दाराशिकोला ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने त्याने संभाजी महाराज यांनाही मारलं. संभाजी महाराजांना मारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना कसं मारावं ते मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितले व त्याप्रमाणे त्यांना मारण्यात आलं. असा गंभीर आरोप दलवाई यांनी केला.
इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का असा सवाल दलवाई यांनी केला. वस्तुस्थिती अमान्य करुन चालणार नाही असही ते म्हणाले. दलवाई यांच्या या दाव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
दरम्यान प्रशांत कोरटकर याला तेलंगणामध्ये काल अटक झाली. एका काँग्रेस नेत्याच्या घरी कोरटकर सापडले या भाजपच्या आरोपाबद्दल हुसेन दलवाई यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
तेलंगणामधील कोण नेता आहे, तो काँग्रेसचा नेता होता की आरएसएसचा नेता होता हे मला माहीत नाही. तो काँग्रेसचा नेता असेल, तर कदाचित त्याला माहीत नसेल की प्रशांत कोरटकर कोण आहे? कोरटकर त्याला भेटायला गेला असेल, म्हणून ते भेटले असतील, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न हुसेन दलवाई यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.