Ahilyanagar mayor : अहिल्यानगरमध्ये महिलाराज; 'ओबीसी' की 'कुणबी' बसणार? महापौरपदाची संधी कोणाला भाजपला की राष्ट्रवादीला?

OBC or Kunbi mayor : अहिल्यानगर महापालिका महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण पडले असून, यावर अजित पवार राष्ट्रवादी की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
Ahilyanagar mayor
Ahilyanagar mayorsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदावर यंदा ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाले आहे.

  • मूळ ओबीसी महिलेला संधी मिळणार की कुणबी प्रमाणपत्र असलेल्या महिलेची निवड होणार, यावर चर्चा सुरू आहे.

  • सत्ता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे राहणार की भाजपकडे जाणार, हा महत्त्वाचा राजकीय प्रश्न बनला आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेच्या दहाव्या महापौरपदी ओबीसी महिला बसणार आहे. पण मूळ ओबीसी महिलेला संधी दिली जाते की, कुणबी प्रमाणपत्र असलेल्या महिलेची या पदावर वर्णी लागते, याची उत्सुकता आहे. याशिवाय, यंदाची सत्ता मनपात सर्वाधिक जागा जिंकणारा अजित पवार राष्ट्रवादी पक्ष घेतो की, भाजपला देतो, हाही कळीचा मुद्दा आहे.

अहिल्यानगर महापालिकेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेतून निवडून आलेल्या नऊ महिला असून, यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व भाजप यांच्या प्रत्येकी 3, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दोन व AIMIM ची एक महिला आहे. AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी अहिल्यानगरमध्ये महापौर AIMIM च्या मदतीशिवाय होणार नसल्याचा दावा इथल्या प्रचार सभेत केला होता. या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठीची महिला उमेदवार AIMIM पक्षाकडेही असल्याने त्यांचा सत्ता प्रक्रियेत सहभाग राहतो काय? तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेकडेही दोन महिला असल्याने त्या काय करतात, याचीही उत्सुकता आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी होणार?

अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप, एकमेकांना दूर ठेवून सत्ता सोपान गाठण्यास एकनाथ शिंदे शिवसेनाही पाठबळ देऊ शकत असल्याने, अशी काही समीकरणे जुळतात काय,महापौरपदासाठी घोडेबाजार रंगतो काय की परस्पर समन्वयाने राष्ट्रवादी व भाजप शांततेत सत्ता स्थापन करतात काय, याचीही उत्सुकता आहे.

Ahilyanagar mayor
Ahilyanagar Mayor : कारभारी आलेत… मग महापौर यायचा कधी? सरकारनं हालचाल करताच आरक्षणाकडे वळल्या नजरा; अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा दावा तगडा

सत्ता नेमकी घेणार कोण...

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने 27, भाजपने 25 व एकनाथ शिंदे शिवसेनेने 10 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय AIMIM व काँग्रेसने प्रत्येकी 2 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने व बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे.

भाजप महापौर पदासाठी उत्सुक!

यंदाचे महापौरपद भाजपकडे घेण्याचा इरादा पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेते, याची उत्सुकता आहे. मागील 2018च्या निवडणुकीनंतर भाजपचा पहिला महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या रुपाने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानेच झाला होता. त्यावेळच्या सत्तेत राष्ट्रवादीने प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, सभागृह नेता अशी पदे भाजपने घेतली होती व राष्ट्रवादीला विरोधी पक्ष नेतेपद दिले होते.

राष्ट्रवादीची पुन्हा तडजोड?

महाविकास आघाडीच्या काळातही राष्ट्रवादीने तेव्हाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांना पाठिंबा देऊन महापौर केले होते. मात्र, त्यावेळी स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती, सभागृह नेते व विरोधी पक्ष नेते, अशी अन्य पदे आपल्याकडे ठेवली होती. या पार्श्वभूमीवर, सलग पाच वर्षे महापालिकेच्या मुख्य सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादीद्वारे यावेळीही सत्तेवर पाणी सोडले जाते की नाही, याची उत्सुकता आहे.

नऊ महिलांपैकी असणार कोण?

महापालिकेत नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवर नऊ महिला निवडून आल्या आहेत. यात अजित पवार राष्ट्रवादीच्या व भाजपच्या प्रत्येकी तीनजणी आहेत. शिंदे सेनेच्या दोन आणि AIMIMची एक महिला आहे. भाजपच्या नगरसेविकांमध्ये गट नेत्या शारदा ढवण (प्रभाग 1), पुष्पा बोरुडे (प्रभाग 7) व आशा कातोरे (प्रभाग 8) तर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सुजाता पडोळे (प्रभाग 13), वर्षा काकडे (प्रभाग 16) व अश्विनी लोंढे (प्रभाग 17) या नगरसेविका आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या रुपाली दातरंगे (प्रभाग 9) व मंगल लोखंडे (प्रभाग 12) आणि AIMIMच्या शहेनाज शेख (प्रभाग 4), अशा नऊ नगरसेविका आहेत.

मूळ ओबीसी की, कुणबी?

याशिवाय सर्वसाधारण जागांवर निवडून आलेल्या ओबीसी महिलांमध्ये आशा डागवाले (प्रभाग 11), सुनीता फुलसौंदर (प्रभाग 14) व संध्या पवार (प्रभाग 2) याही तीनजणी आहेत. पण महापौरपद ओबीसी महिला, असे राखीव असल्याने या सर्वसाधारण मधून निवडून आलेल्या महिलांना संधी मिळणार की नाही, याचा संभ्रम आहे.

Ahilyanagar mayor
BJP victory Ahilyanagar : माजी महापौरानं चांगलंच मनावर घेतलं; राजकीय वारसा नसलेल्या ‘पीए’च्या आईला भाजपकडून नगरसेवक केलं

FAQs :

1) अहिल्यानगर महापालिकेचे महापौरपद कोणासाठी आरक्षित आहे?
👉 यंदा महापौरपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे.

2) कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा का चर्चेत आहे?
👉 मूळ ओबीसी महिला आणि कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांमध्ये निवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

3) अहिल्यानगरमध्ये सत्ता कोणाच्या हातात जाण्याची शक्यता आहे?
👉 अजित पवार गटाची राष्ट्रवादी किंवा भाजप यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे.

4) महापौरपदाचा निर्णय कधी होणार?
👉 महापालिकेतील राजकीय समीकरणांनुसार लवकरच महापौरपदाचा निर्णय अपेक्षित आहे.

5) या घडामोडींचा महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 ओबीसी आरक्षण आणि पक्षीय राजकारणामुळे स्थानिक पातळीवर मोठा राजकीय प्रभाव पडू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com