Municipal Election : 'पक्षाला माझा काही उपयोग नाही, घरी बसवलं'; पण भाजप-राष्ट्रवादी युतीत 'उदंड झाले उपरे'!

Ahilyanagar Municipal Election: BJP–Ajit Pawar NCP Face Internal Dissent : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युतीत बाहेरून आलेल्या उमेदवारांच संधी मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे.
BJP–Ajit Pawar NCP
BJP–Ajit Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेकांना घरी बसवले आहे. भाजपच्या जुन्या-जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने असंतोष खदखदत असून, त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी होईल, असा सूचक इशारे दिले जात आहेत.

पण भाजप-अजित पवार राष्ट्रवादीत 'उंदड झाले उपरे', असे खासगीत म्हणत विरोधक डिवचून आनंद घेत आहेत. मतदानापूर्वी, या निष्ठावंतांना शांत करण्यासाठी नेत्यांना पराकाष्ठा करावा लागणार असे दिसते आहे. विशेष म्हणजे, भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युतीत तब्बल बाहेरून आलेल्या 21 जणांना संधी देण्यात आली आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी युतीमधील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात दोन राष्ट्रवादीचे, तर तीन भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. यामुळे अहिल्यानगर शहरात विखे पाटील-जगताप एक्स्प्रेस सुसाट असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. पण दुसरीकडे ज्या निष्ठावंतांना घरी बसवले आहे, त्यांचा असंतोष खदखदत आहे.

भाजप (BJP) आणि अजित पवार राष्ट्रवादीमध्ये बाहेरून आलेल्या संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीत तब्बल नऊ, तर भाजपने 12 जणांना संधी दिली आहे. या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी 34, तर भाजप 3 जागा लढवत आहे. यात दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे.

BJP–Ajit Pawar NCP
Bunty Jahagirdar murder : राजकीय वर्चस्वातून बंटी जहागीरदारला 'टिपला'; गोळ्या झाडताना दोघा आरोपींकडून 'एकच भाई...', असा उल्लेख!

भाजप पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीकडून बॅटिंग

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महेश तवले, आशा किशोर डागवाले, गीतांजली सुनील काळे, सुनीता किसन भिंगारदिवे या भाजपमधील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली. गीतांजली काळे या भाजपकडून उपमहापौर राहिल्या होत्या. महेश तवले भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी होते.

BJP–Ajit Pawar NCP
ED action on IAS : बड्या IAS अधिकाऱ्याचा 'गेम' ओव्हर! 1500 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा दणका; नेमकं प्रकरण काय?

आरपीआय, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संधी

याशिवाय रिपब्लिकन पक्षातील आठवले गटाचे शहराध्यक्ष किरण दाभाडे, काँग्रेसच्या संध्या बाळासाहेब पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या सुनीता भिंगारदिवे यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. याशिवाय बाबासाहेब नागरगोजे, सागर शिंदे यांनाही निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

शिवसैनिकांना भाजपकडून संधी

शिवसेनेचे विजय पठारे व अमोल येवले यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आकाश कातोरे यांची आई आशा लोभाजी कातोरे, युवासेनेचे शहरप्रमुख महेश लोंढे, पूर्वाश्रमी शिवसेनेचे महेंद्र बिज्जा, मित्र पक्ष अजित पवार राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची सून रोशनी प्रवीण त्र्यंबके, सागर मुर्तडक, विकास वाघ ऊर्फ विकी, मयुरी सुशांत जाधव, सुभाष लोंढे आणि पुष्पा अनिल बोरूडे यांना भाजपकडून संधी देण्यात आली.

डावलेल्यांची खदखद....

विशेष म्हणजे, बाहेरच्यांना उमेदवारी देताना, त्यांचे पक्ष प्रवेशही करण्यात आलेले नाहीत. भाजपमधील तीन उमेदवार असे आहेत की, पक्षातील पदाधिकाऱ्यांना हे उमेदवार देखील माहिती नाहीत. भाजपमध्ये सुरूवातीला जुने अन् नवे, असा वाद पेटलेला आहे. मुंबईत बैठकीला जुन्यांची उपस्थिती नव्हती. निष्ठावंत भाजपपासून काहीसे दूर जाऊ लागले आहेत. त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी होईल, अशी चर्चा आता रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com