Eknath Shinde betrayal : '400 वर्षानंतरही गद्दारीचा डाग पुसला जात नाही, तर यांच्या किती पिढ्या..'; ठाकरेंनी शिंदेच्या 'वर्मी घाव' घातला

BMC Election Rally: Uddhav Thackeray Attacks Eknath Shinde, BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत एकनाथ शिंदे यांच्या वर्मी घाव बसेल, अशी टीका केली.
Uddhav Thackeray Attacks
Uddhav Thackeray AttacksSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Election : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्ताने शिवतीर्थावर घेतलेल्या प्रचार सभेत अतिशय संयमाने भाषण केलं. मराठी माणसांसाठी ही शेवटी लढाई असल्याने ठाकरेंच्या भाषणात गंभीरपणा अधिक होता.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारीवर गंभीरपणे बोलताना, इतिहासाचा दाखला दिला. 'खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांच्यावरील गद्दारीचा डाग 400 वर्षांपासून पुसला जात नाही, तर यांच्या कपाळावरचा हा डाग पुसण्यासाठी किती पिढ्या जावा लागतील?' असा प्रश्न करत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या वर्मी घाव घातला.

मुंबई (BMC Election) महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची युती आहे. या तिन्ही पक्षाची काल संयुक्त सभा झाली. जयंत पाटील, राज ठाकरे आणि शेवटी उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. राज ठाकरे यांनी भाजप देशात आदानीस्तान कसं उभारत आहे, यावर धक्कादायक असा प्रकाशझोत व्हिडिओच्या माध्यमातून मांडला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी जोरदार पण गंभीर भाषण केले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "एकच दिवस जागा, पण वाघासारखा जगा, शंभर दिवस शेळी सारखं जगण्यात काहीही अर्थ नसतो, जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा, शेळी सारखं जगायचं असेल, तर भाजपमध्ये जा. जे गद्दार गेले त्यांना जाऊ दे, असे अनेक जण आले अन् गेले, अस्वलाच्या अंगावरील एक केस गेला, तर काही फरक पडत नाही, केस येतच असतात."

Uddhav Thackeray Attacks
BJP cash distribution allegation : भाजपवाल्यांची तीन-तीन हजारांची पाकिटे.., शिंदेच्या शिलेदारांनी पकडली! मग काय उडाला भडका..!

'भाजपला राजकारणामध्ये पोर होत नाही, हे त्यांचे शल्य आहे आमचं नाही. म्हणून मोहन भागवत सांगत आहेत की, अपत्य वाढवा. पण होत नाही, तर आम्ही काय करू? आम्हाला होत आहेत. तुम्हाला होत नाही मुळात विचारांचं बीज लागतं, ते भाजपमध्ये नाही. नेमका भाजप कशासाठी स्थापन केला गेला हेच त्यांना माहिती नाही. उठायचं कधी आणि बसायचं कधी हेच भाजपला माहिती नाही, तर पक्ष जगणार कसा? हे आलेली सूज, सत्तेची माज आहे,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray Attacks
Nilesh Lanke criticism : लंकेंचा तोफखाना धडाडला; विखेंसह जगतापांना सूचक इशारा, महापौर देखील सांगून टाकला...

गद्दारीचा शिक्का पिढ्यान् पिढ्या

उद्धव ठाकरे यांनी गद्दारीवर अतिशय गंभीरपणे भाष्य केले. ते म्हणाले, "इतिहास कोण बघत असेल, तर मला त्याची कल्पना नाही. खंडोजी खोपडे यांचे नाव घेतल्यावर आपण काय बोलतो, सूर्याजी पिसाळ असं नाव घेतल्यावर काय बोलतो, असा प्रश्न करताच, खालून प्रेक्षकांकडून आवाज आला गद्दार.., तानाजी मालुसरे आणि बाजी घोरपडे यांचे नाव घेतल्यावर आपण काय बोलतो, 400 वर्षे होऊन सुद्धा त्यांच्या कपाळावरचा डाग पुसला जात नसेल, तर यांच्या कपाळावरचा डाग पुसण्यासाठी किती पिढ्या जाव्या लागतील?" मग तुम्ही ठरवा आम्ही, तर ठरवलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्य नाही, त्यांचा मावळा देखील होणे शक्य नाही, पण मोगलांना टक्कर देणारा महाराष्ट्रात जन्माला आला, तसाच लढा आपण आता लढत आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

भाजप मुलाबाळांचं नुकसान करतोय

'त्याच मातीत जन्माला आलो आहोत तेच शस्त्र आपल्या हातात आहेत, जगायचं कसं हे आपण ठरवायचं, इतिहासात नोंद कशी झाली पाहिजे हे आपण ठरवायचं, तुमच्यासमोर सत्य मांडलेला आहे. पण एवढं करूनही भाजप असाच वागत राहिल्यास ते त्यांच्या मुलाबाळांचे देखील नुकसान करत आहेत,' असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

महाराष्ट्रासाठी ठाकरेंचं आवाहन

उद्धव ठाकरे यांनी यानंतर भर सभेत समोर बसलेल्या शिवसैनिकांना हात जोडले, विजयासाठी हातात मशाल घ्या, इंजिन सोबत आहे, विजयाचे तुतारी फुंगा, असे आवाहन केले. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र करू शकतो, सेनापती बापट म्हणाले होते, महाराष्ट्र कधीच मरू शकत नाही, जो राष्ट्राला मारायला येईल त्याला महाराष्ट्र मारल्याशिवाय राहणार नाही, ही दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच ही एकजूट केलेली आहे, गंमत म्हणून आम्ही एकत्र आलेलो नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मुंबई लुटू देणार नाही, तुटू देणार नाही आणि झोकू देणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्या आणि उद्याच्या युद्धाला सामोरे जा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com