Shiv Sena Eknath Shinde faction
Shiv Sena Eknath Shinde factionSarkarnama

Shiv Sena Eknath Shinde faction : होय, मी हिंदुत्ववादी गुंड! उमेदवारी का नाकारली? एकनाथ शिंदे शिवसेनेत असंतोष उफाळला...

Ahilyanagar Civic Polls: Amol Humbe Alleges Against Anil Shinde, Sachin Jadhav : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यावर एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराजी उफाळली आहे.
Published on

Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यावरून, महायुती सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची खदखद आता समोर येऊ लागली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असंतोषच उफाळला आहे. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अमोल हुंबे यांनी आपल्यावर स्थानिक नेत्यांनी केलेल्या अन्यायावर हल्लाबोल चढवला आहे.

अमोल हुंबे यांनी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांचे नाव न घेता, माझ्यावर गुंड असल्याचा शिक्का मारून, डावलल्याचा आरोप केला. यावर 'होय, मी हिंदुत्ववादी गुंड आहे! पण उमेदवारी का नाकारली? याचे उत्तर यांना द्यावेच लागेल अन् ते मी घेणार,' असा इशारा अमोल हुंबे यांनी दिला आहे.

अमोल हुंबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "अपक्ष म्हणून अगोदर उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. शिंदेसाहेबांनी माझ्या हिंदुत्वाची देखील दखल घेतली आहे. हिंदुत्वासाठी जेव्हा, जेव्हा कट्टर भूमिका घेतली, तेव्हा माझ्या मागे एकनाथ शिंदे उभे राहिले. पण माझे तिकिट का कापले एबी फाॅर्म मला का मिळाला नाही याचे उत्तर शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, निरीक्षक, असो यांनी याचे उत्तर दिलेले नाही."

'हिंदुत्वासाठी (Hindutva) लढताना माझ्यावर खूप गुन्हे दाखल झालेले आहेत. पण मलाच का डावललं? यांचे उत्तर पक्षातील स्थानिक नेत्यांकडे कोणी देऊ शकत नाही. मी बाहेरून ऐकलं आहे की, लोकं म्हणतात, अमोल हुंबे हा गुंड आहे. होय, मी गुंड आहे. हिंदुत्वादी गुंड आहे. पण आपलेच लोक मला खाली ओढायचे प्रयत्न करत आहेत. पण जनता हुशार आहे. तिला सर्व माहिती आहे,' असेही अमोल हुंबे यांनी म्हटले.

Shiv Sena Eknath Shinde faction
Congress ticket controversy : धर्म आडवा आला, हिंदू असल्याने उमेदवारी नाकारली; मुलाच्या उमेदवारीसाठी लढणारा माजी खासदार काँग्रेसवर संतापला!

'खरे कोण, खोटं कोण, याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. माझ्याकडे असे काही व्हिडिओ आहेत, ते फिरले, तर मी अपक्ष देखील हिंदुत्वाच्या बळावर निवडून येऊ शकतो, असा दावा अमोल हुंबे यांनी केला आहे. खरे हिंदुत्ववादी अन् खोटे हिंदुत्ववादी ओळखावे,' असेही हुंबे यांनी शेवटी म्हटले.

Shiv Sena Eknath Shinde faction
Nashik NMC Election: बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबर डान्सचा आरोप; तरी विसरभोळ्या भाजपकडून बडगुजरांच्या घरी तिघांना उमेदवारी?

भाजपच्या नाराजांनी शिवसेनेची वाट धरली

एकनाथ शिंदे शिवसेना स्वबळावर लढत असून, 54 जागी लढत आहे. भाजपमधील नाराजांचा फायदा शिवसेनेने घेतला. विद्यमान 24 नगरसेवकांना किंवा त्यांच्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिली आहे. तिकिट कापलेल्या भाजपमधील निष्ठावंतांनी शिवसेनेची वाट धरली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघा बंडखोरांना शिवसेनेकडून स्थान देण्यात आले आहे.

भाजप, राष्ट्रवादीमधील नाराज शिवसेनेच्या गळाला

भाजपने उमेदवारी नाकारलेले नितीन शेलार, संगीता खरमाळे, स्वप्नजा वाखुरे, नरेंद्र कुलकर्णी, निर्मला कैलास गिरवले यांना शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आली. तसंच अजित पवार राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर यांनीही शिवसेनेचे धनुष्य उचलले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com