Sangram Jagtap And Sushma Andhare : सुषमा अंधारे काही थांबेना, आणखी एक व्हिडिओ आणला समोर; जगतापांच्या लोकांच्या दहशतीविरोधात 'व्हिडिओ बाॅम्बवर.., बाॅम्ब..!'

Ahilyanagar Election: Sushma Andhare Shares Video Alleging NCP Terror : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी आमदार संग्राम जगताप यांच्या लोकांच्या दहशतीची आप बीती सांगणारा व्हिडिओ पुन्हा समोर आणला आहे.
Sushma Andhare Shares Video
Sushma Andhare Shares VideoSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या लोकांच्या दहशतीची आप बीती सांगणारा आणखी एक व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समोर आणला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणारे रामदास वाणी यांचा हा व्हिडिओ आहे. त्यांनी दहशतीची आपबीती सांगितली असून, यामुळे आणखी खळबळ उडाली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरवातीला, 15 तासांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात आमदार संग्राम जगताप सोबत नसताना, संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक आणि बॉडीगार्ड, नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराचा घराबाहेर रिव्हॉल्व्हर घेऊन उभे आहेत, असे पोस्ट करत, त्याखाली हॅशटॅग दहशत आणि ठोकशाही, असे लिहिलं होतं.

यानंतर, सुषमा अंधारे यांनी तीन तासापूर्वी, आणखी एक व्हिडिओ एक्स खात्यावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रामदास वाणी यांचा आहे. उमेदवार वाणी यांनी दहशतीची आप बीती यात मांडली आहे. यावर सुषमा अंधारे यांनी, प्रचारासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या श्री सहाय्यकाने, अंगरक्षकाचा व्हिडिओ निकाल शेअर केला होता.

Sushma Andhare Shares Video
BMC Election : मुंबईच्या रणसंग्रामात 1700 उमेदवार; लक्ष मात्र शिवसेना उबाठा अन् भाजपच्या 7 हायव्होल्टेज लढतींकडे

अहिल्यानगर इथल्या प्रभाग क्रमांक एक मधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत संग्राम जगताप यांच्या लोकांनी कशी दहशत निर्माण केली, असल्याचा दावा केला आहे. सुषमा अंधारे यांच्या पोस्टमध्ये उमेदवार राम माने असे म्हटले आहे. परंतु व्हिडिओ ऐकल्यावर संबंधित व्यक्ती हा रामदास वाणी असे नाव सांगत आहे.

Sushma Andhare Shares Video
Sushma Andhare Allegations: सुषमा अंधारे यांचा 'व्हिडिओ बॉम्ब'; अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची दहशत अन् ठोकशाही!

रामदास विठ्ठल वाणी यांनी व्हिडिओमध्ये आप बीती सांगताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर महापालिकेतील उमेदवार आहे. उमेदवार म्हणून प्रचार करत असताना, अनेक अडथळे येत आहेत. मुलं मागे येतात. गन दाखवली जाते. तीन ते चार दिवसांपासून गन दाखवण्याचे प्रकार वाढले आहेत. उमेदवारी मागे घे, प्रचार स्लो-गतीने कर, असे वेगवेगळ्या प्रकार माझ्याभोवती घडत असल्याचे म्हटले आहे.

यानंतर पुढे, माझ्या मालमत्तेमध्ये, दोन पोलिस अन् दोन अनोळखी माणसं, घुसले. पोलिस खुलं रिव्हॉल्व्हर हातात घेऊन मालमत्तेत फिरत होते, माझ्याकडील बिहार कामगारांना धमकावण्यात आलं. यामुळे ते मोबाईल बंद करून निघून गेले. ज्याअर्थी पोलिस लोकं, रिव्हॉल्व्हर काढून धमकावत असतील, हा लोकशाहीचा गळा अवळल्यासारखं आहे, अशी खंत रामदास वाणी यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com