Farmer Suicide : बैल पोळा केला नाही, आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू; अंत्यविधीला कुटुंबाकडे पैसे नाही, ग्रामस्थांनी काढली वर्गणी

Ahilyanagar Newasa Farmer Nanasahab Thobal Dies After Consuming Poison : नेवाशातील बाबासाहेब सरोदे यांच्यापाठोपाठ नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्यानं बैल पोळा सणाला मृत्यूला कवटाळले आहे.
Nanasahab Thobal
Nanasahab ThobalSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar farmer suicide : अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे. बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला विषारी द्रव्य घेत मृत्यूला कवटाळले. नानासाहेब केशव ठोबळ (वय 45, रा. गोयगव्हाण, ता. नेवासा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बाबासाहेब सरोदे यांच्या मृत्यू पाठोपाठ बैल पोळा सणाला नानासाहेब ठोबळ यांचा मृत्यू झाल्याने नेवाशावर शोककळा पसरली आहे. आठवड्यातील पाच दिवसांत दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने कर्जमाफीचा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

शेतकरी (Farmers) नानासाहेब ठोबळ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. विषारी द्रव्य पिल्याने त्यांचा मृत्यू झाला. कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खते, औषधे घ्यायला पैसे नसल्याने नानासाहेबांनी टोकाचे पाऊल उचलल्याची त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवशातील दोन शेतकऱ्यांनी पाच दिवसांत मृत्यूला कवटाळले आहे.

17 ऑगस्टला नेवाशाच्या वडुले गावातील बाबासाहेब सरोदे यांनी विषारी द्रव्य घेतल्याने शेतात मृ्तावस्थेत आढळले. बाबासाहेब सरोदे यांनी मृत्यूपूर्वी काढून ठेवलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्जबाजारीपणा कंटाळून मृत्यूला कवटाळत असल्याचे म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर (Social Media) वेगानं व्हायरल झालेला आहे.

Nanasahab Thobal
Tejashwi Yadav Tweet Controversy : PM मोदींची गया इथं सभा, तेजस्वी यादवांचं 'खोचक' ट्विट; भाजप आमदारांची गडचिरोली पोलिसांकडे तक्रार, नेमकं काय प्रकरण...

बाबासाहेब सरोदे यांच्या पाठोपाठ काल, बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला 21 ऑगस्टला नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवले. नानासाहेब ठोबळ यांच्यापाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई, असा परिवार आहे. दरम्यान, ठोबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबियांकडे पैसे नव्हते. ग्रामस्थांनी वर्गणी करून नानासाहेब ठोबळ यांच्यावर अत्यंविधी केला.

Nanasahab Thobal
तुमच्याकडे दोन मतदान कार्ड असतील तर सावधान! मतदानाचा अधिकार गमावून बसाल

नानासाहेब ठोबळ यांच्या कुटुंबियांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरं औताडे यांनी भेट घेतली. नेवाशातील दोन शेतकऱ्यांनी आठवड्यातील पाच दिवसात आत्महत्या केल्या आहेत, या आत्महत्या नसून, सरकारी धोरणाने घेतलेले बळी, असा घणाघात पांडुरंग औताडे यांनी केला.

बैल पोळा साजराच केला नाही, उलट...

नेवासा तालुक्यातील वडुले इथल्या बाबासाहेब सुभाष सरोदे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे गावकरी देखील आक्रमक झाले असून आज बळीराजाचा सर्वात बैल पोळा सण साजरा न करता त्यांनी काळ्या फित बांधत सरकारचा निषेध केला आहे. अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट बघत आहे, असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com