Shani Shingnapur forensic audit : शनिशिंगणापूर देवस्थानचे 5 वर्षांचे फॉरेन्सिक ऑडिट; गैरव्यवहाराचा शोध, 2,384 कर्मचाऱ्यांवरही प्रश्न

Five-year forensic audit begins to probe financial irregularities Neawasa Shani Shingnapur Devasthan : धर्मादाय आयुक्तांच्या चौकशीत गैरप्रकार उघड; शनिशिळेला तेलामुळे हानी झाली का, पुरातत्व विभागाचा अहवाल प्रलंबित
Shani Shingnapur
Shani ShingnapurSarkarnama
Published on
Updated on

Shani Shingnapur latest news : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त संस्थेतील गैरव्यवहार शोधण्यासाठी गेल्या पाच वर्षांचे फाॅरेन्सिक ऑडिट सुरू करण्यात आले आहे.

तसेच शनिदेवाच्या शिळेची भेसळयुक्त तेलामुळे काही हानी पोहोचले का याची पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली आहे. त्याचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती देवस्थानचे प्रशासक तथा विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

नेवाशातील श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त संस्थेतील कर्मचाऱ्यांनी (Worker) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम अहिल्यानगर दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे उपस्थित होते.

देवस्थानेमध्ये सध्या 2384 कर्मचारी कार्यरत आहेत. इतक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही. त्याचा अहवाल राज्य सरकारला (Maharashtra Government) पाठवला आहे. देवस्थानच्या रुग्णालयात 80 खाटा आहे. मात्र अनेक कर्मचारी अतिरीक्त आहे. देवस्थानकडे 17 बसेस आहेत. चालक म्हणून 72जण आहेत. असेच देवस्थानच्या अनेक विभागात अतिरीक्त कर्मचारी आहेत, असे डाॅ. गेडाम यांनी सांगितले.

Shani Shingnapur
Ahilyanagar Municipal Employees Strike : धीरजसिंह राजपूत हत्येनंतर अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; नागरी सेवांवर परिणाम?

संस्थांमधील धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेईल. त्यासाठी सरकारच मार्गदर्शन करेल. राज्य सरकारने यापूर्वी धर्मदाय आयुक्तांमार्फत चौकशी केली होती. त्यामध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस आले. संस्थेसाठी कारभार करताना काही आर्थिक चुका झाल्या आहेत का, त्याची वसुली करायची का, यासाठी फाॅरेन्सिक ऑडिट उपयुक्त ठरणार आहे असे डाॅ. गेडाम यांनी सांगितले.

Shani Shingnapur
Shevgaon Municipal Council : शिवसेना नगराध्यक्षांच्या पतीचा नगरपरिषदेत हस्तक्षेप? 18 नगरसेवकांच्या तक्रारी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आदेश

देवस्थानचा कारभार हा सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून व्हावा, तो खासगी कंपनी सारखा नसावा, अशीही टिप्पणी डाॅ. गेडाम यांनी केली. शनिशिंगणापूरमधील 41 लटकूंवर गुन्हे दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com