

Maharashtra industry news : दावोसच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेत मागच्यावर्षी 2025 मध्ये झालेल्या 500 कोटींच्या सामंजस्य गुंतवणूक करारातून वर्षभरातच, सुपा (ता. पारनेर) इथं तौरल इंडिया प्रकल्प आज सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, 'उद्योजकांना कोणी त्रास दिला तर, त्यांना ठोकून काढा. कायदा सुव्यवस्था राखून उद्योजकांना संरक्षण द्या,' असं धडाकेबाज विधान केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धडाकेबाज विधानामुळे कार्यक्रमात एकच 'चुळबूळ' सुरू झाली. काही क्षणात ती हेरताच, 'ठोकून काढा म्हणजे, कायद्याने ठोकून काढा,' असेही पुढे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, सुपा MIDCमधील हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे. सुपा MIDC मध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट आला ही आनंदाची बाब आहे. स्वतंत्र भारतात आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरिता मेक इन इंडिया महत्वाचे आहे. या कंपनीच्या माध्यमातून परदेशातून आयात करावा लागणार माल आता भारतातचं तयार होणार आहे. भारताच्या शक्तीचा आविष्कार हा उद्योग आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेने प्रगती केली, भारत देश लवकर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. अर्थव्यवस्था गतीला पोषक उद्योग आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे. आणि यात दमदार पाऊल महाराष्ट्र (Maharashtra) टाकत आहे. दावोस 2025 मध्ये 75 करार ऍक्टिव्ह झाले, आणि त्यातला आजचा प्रोजेक्ट करार आहे,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
'महाराष्ट्राची प्रगती पुणे, मुबंई इथं थांबत होती. मात्र आता सर्वच ठिकाणी जाळ पसरवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातले पाच जिल्ह्यामध्ये 50 हजार कोटीची गुंतवणूक आणली आणि 11 हजार 519 कोटी गुंतवणूक होणार, उत्तर महाराष्ट्रात 75 हजार लोकांना रोजगार मिळणार,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
'ही कंपनी डिफेन्स मध्ये महत्वाचे भूमिका बजावणार आहे. उद्योग पर्यावरण पूरक असले पाहिजे आणि ते महाराष्ट्रमध्ये करायचे आहे. उद्योग आले तर, उद्योजकांना त्रास देणारे तयार होतात. काही गोष्टी कानावर आल्या आहेत. त्यांचा बंदोबस्त मी लावला आहे. सुपा MIDCवाढणारी आहे. कोणीही त्रास दिला तर, ठोकून बंद करणार, कायद्याने ठोकून बंद करणार,' असा गर्भित इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
'महाराष्ट्राच्या कुठल्याही MIDCमध्ये झुंडशाही, गुंडशाही खपवून घेणार नाही. उद्योजकांना कोणी त्रास दिला तर, त्यांना ठोकून काढा. कायदा सुव्यवस्था राखून उद्योजकांना संरक्षण द्या. ठोकून काढा म्हणजे, कायद्याने ठोकून काढा,' असे मुख्यमंत्री यांनी म्हटले.
दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, यात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11 हजार 519 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. याद्वारे 18 हजार रोजगाराची निर्मिती होणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75 हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.