Organ trafficking investigation : अवयव तस्करीतील सहा डाॅक्टर सापडेना; पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, दोघांचा जामीनासाठी अर्ज!

Ahilyanagar Police Search Six Doctors in Organ Trafficking Case : अहिल्यानगरमध्ये अवयव तस्करीच्या दाखल गुन्ह्यात एकाही डाॅक्टराचा शोध घेण्यास पोलिसांना यश येत नसल्याने तपासावर शंका घेतली जाऊ लागली आहे.
Organ trafficking investigation
Organ trafficking investigationSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar organ trafficking case : करोनाचा संसर्गाचा बनावट चाचणी अहवाल, त्याआधारे वयोवृद्ध रुग्णावर उपचार सुरू असताना, त्यात त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची त्या काळात परस्पर विल्हेवाट लावली. रुग्णाच्या मुलाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून तोफखाना पोलिसांनी पाच डाॅक्टर आणि एक लॅब तंत्रज्ञ, असं सहा जणांविरोधात दाखल गुन्हा दाखल झाला.

शनिवार दाखल गुन्ह्यात आता डाॅ. गोपाळ बहुरूपी आणि डाॅ. सुधीर बोरकर यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपअधीक्षक डाॅ. दिलीप तिप्रसे यांनी आरोपांना सर्वोच्च न्यायालयाच्या गाइडलाइननुसार, जामीन मिळवण्याचा अधिकार आहे. आपला तपास सुरू आहे, असे सांगितले.

दाखल गुन्ह्यात, डाॅक्टरांपैकी डाॅ. गोपाळ बहुरूपी आणि डाॅ. सुधीर बोरकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. मात्र या दोन्ही डाॅक्टरांना (Doctor) दिलासा मिळू शकलेला नाही. या जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून न्यायालयाने म्हणणे मागवले आहे.

फिर्यादी अशोक खोकराळे यांनी न्यायालयात (Court) स्वतःकडून वकील दिले आहेत. वकील अनिकेत कुल्लाळ आणि वकील योगेश नेमाने यांनी फिर्यादीच्यावतीने युक्तिवाद केला. न्यायाधीश एम. एच. शेख यांनी सरकारला म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्याचा आदेश दिला. न्यायालयाने या अर्जावर 28 ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे.

Organ trafficking investigation
Ravi Rana Navneet Rana controversy : 'तुमचा स्वाभिमान पक्ष, तर बायको भाजपमध्ये!' राणा दाम्पत्यांच्या अकलीच्या घोड्यांवर बच्चू कडूंचा 'प्रहार' (Video)

ऑगस्ट 2020 मधील करोना काळात वयोवृद्ध रुग्णाचा बनावट करोना अहवाल करून, त्याद्वारे चुकीचे उपचार केले. तसंच उपचाराचे अवाजवी बिल काढले. त्याची वसुली देखील केली. यातच रुग्ण दगावला. यानंतर त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. यावरून रुग्णाचा मुलगा फिर्यादी अशोक खोकराळे यांनी तक्रार केली.

Organ trafficking investigation
Air India Himroo design : 'हिमरू'चा साज, बोइंग विमानाच्या शेपटीवर; एअर इंडियाकडून छत्रपती संभाजीनगरच्या कलेचा गौरव

उच्च न्यायालयाने तक्रारीची गंभीर दखल घेतल्यानंतर तोफखाना पोलिसांनी पाच डाॅक्टर आणि एक लॅब तंत्रज्ञ, अशा सहा जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. मानवी अवयवांची तस्करी करणे, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणे आदी मुद्यांवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जामीन अर्जावर हस्तक्षेप अर्ज

दरम्यान, या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आक्रमक झाले आहेत. डाॅक्टरांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. याशिवाय गुन्हा दाखल होताच, या सर्व डाॅक्टरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

रुग्णांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

डाॅक्टरांची संघटना असलेल्या 'आयएमए'च्या अहिल्यानगरमधील शाखेचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. डाॅक्टरांना या प्रकरणात गोवलं जात आहे. डाॅक्टरांवर अन्याय झाल्यास, रुग्णसेवा बंद आंदोलनाचा इशारा दिला. यावर देखील गिरीश जाधव यांनी पोलिसांकडे आयएमएच्या अहिल्यानगर शाखेचे पदाधिकारी अन् संघटनेवर बाॅम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली.

डाॅक्टरांच्या मुद्यावरून ठाकरेसेनेत धुसफूस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावरून तणाव निर्माण झाला आहे. एकप्रकारने यावरून फूट पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर डाॅक्टर अन् त्यांच्या संघटनेला अंगावर घेणे परवडणारे नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यातून पक्षाच्या अहिल्यानगरमधील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com