Tanpure Cooperative Sugar Factory : बंद पडलेल्या 'तनपुरे'ची निवडणूक गाजणार; चार पॅनल मैदानात असणार

Ahilyanagar Rahuri Four Panels in Fray for Tanpure Sugar Factory Election : राहुरीमधील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 31 मे रोजी मतदान होईल.
Tanpure Cooperative Sugar Factory
Tanpure Cooperative Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Rahuri elections : राहुरीमधील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 31 मे रोजी मतदान होणार आहे. एक जून रोजी मतमोजणी होईल.

तनपुरे जिंकण्यासाठी चार पॅनल निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. तनपुरे कारखाना बंद पडला आहे, तरी राजकीय 'बॉयलर' पेटला आहे.

तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली. संचालक मंडळ बरखास्त झाले. थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने (Bank) कारखान्यासह मालमत्ता ताब्यात घेतली. सरकारतर्फे कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली. कारखाना बंद पडला. कामगार बेरोजगार झाले. बंद पडलेल्या कारखान्यातील मौल्यवान वस्तूंना पाय फुटले. मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या. त्याकडे राजकीय धुरिणांचे दुर्लक्ष झाले.

Tanpure Cooperative Sugar Factory
UPSC 2025 results : 'UPSC'मध्ये अहिल्यानगरचा 'चौकार'; अंगणवाडी सेविका अन् शेतकरी कुटुंबातील मुलांचं यश

कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ, ज्येष्ठ नेते अरुण कडू, भरत पेरणे, संजय पोटे, पंढरीनाथ पवार, राजूभाऊ शेटे, सुखदेव मुसमाडे आदींनी पुढाकार घेतला. उच्च न्यायालयाच्या (Court) औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यात कारखान्याची निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने येत्या 31 मे 2025 पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होत आहे.

Tanpure Cooperative Sugar Factory
Karuna Munde Vs Walmik Karad : वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार; करुणा मुंडेंच्या दाव्यानं खळबळ

तीन वर्षांनंतर राजकीय धुरिणांना कारखान्याची आठवण झाली आहे. शेतकरी विकास मंडळातर्फे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, महायुतीच्या राहूरी तालुका विकास मंडळातर्फे आमदार शिवाजीराव कर्डिले, तनपुरे कारखाना बचाव कृती समितीतर्फे अमृत धुमाळ यांनी स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरविणार असल्याची घोषणा केली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या जनसेवा मंडळातर्फे पॅनल उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे चार पॅनल निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. सभासदांना मात्र कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी तीन वर्षांनंतर राजकीय धुरिणांना अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com