
Ahilyanagar UPSC toppers : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून चौघांनी यश मिळवलं. यश मिळवणारे चौघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांच्या यशाचं कौतुक होत आहे.
यश मिळवणाऱ्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतील आहे. ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्वर मुखेकर, सौरव ढाकणे आणि अभिजित आहेर यांनी हे यश मिळवलं आहे.
केंद्रीय लोकसभा आयोगाने (UPSC) सप्टेंबर 2024मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेच्या मुलाखती जानेवारी ते एप्रिल 2025या कालावधीत घेतल्या गेल्या. या परीक्षेचा निकालात अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघांनी यश मिळवले.
निंबळक (ता. नगर) इथला ओंकार खुंटाळे याने 673 व्या रँक मिळवत, 'UPSC' मध्ये यश मिळवले. ओंकारची आई मीनाक्षी अंगणवाडी सेविका असून, वडील राजेंद्र देहरे (ता.नगर) इथल्या विकास सेवा सोसायटीत सचिव आहेत. आई ज्या अंगणवाडीत जायची, त्याच अंगणवाडीत ओंकार जायचा, चौथीपर्यंतचे शिक्षण निंबळकच्या जिल्हा परिषद शाळेत, तर पाचवी ते दहावी मारुतराव घुले पाटील विद्यालयात शिक्षण घेतले. न्यू आर्ट्स महाविद्यालयातून बी.एस्सी पूर्ण केले. पुण्यात (PUNE) 'UPSC'चा अभ्यास करताना त्याने एम.एस्सीची पदव्युत्तर पदवीही मिळवली. पाचव्या प्रयत्नात त्याने 'UPSC'मध्ये यश मिळवले.
कोरडगाव (ता. पाथर्डी) इथला ज्ञानेश्वर मुखेकर याने 707 वी रँक मिळवली. दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या ज्ञानेश्वरचे सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. यापूर्वी त्याने दोनदा 'MPSC' परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. जिद्दीने त्याने 'UPSC'साठी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यश मिळवले. ज्ञानेश्वर याचे वडील शेतकरी, तर त्याची आई अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे.
ढाकणवाडी (ता. पाथर्डी) इथल्या सौरव ढाकणे याने 628वी रँक मिळवली. त्याचे वडील राजेंद्र ढाकणे निवृत्त शिक्षक, तर आई गृहिणी आहे. सौरवने शेवगावच्या शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेले, तर काकडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबईतून सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याने 'UPSC'चा अभ्यास करत यश मिळवले.
पळसपूर (ता. पारनेर) इथला अभिजित आहेर याने 734 वी रँक मिळवली. त्याने पाचव्या प्रयत्नात यश मिळवलं. अभिजितचे वडील सहदेव निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य, तर आई प्रा. विजया पारनेर महाविद्यालयात प्राध्यापक आहे. अभिजितने बारावीपर्यंतचे शिक्षण पारनेरमध्येच पूर्ण केले. सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याने 'UPSC'साठी तयारी सुरू केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.