Religious Structure Demolition : धार्मिक स्थळावर पहाटचं 'जेसीबी' फिरवला; तीन संशयित ताब्यात, 'SRPF'च्या तुकड्यांसह अख्खा शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त शहरात उतरवला!

Ahilyanagar Police Tighten Security After Religious Structure Demolished with JCB SRPF Deployed : अहिल्यानगर शहरातील गांधी मैदानातील धार्मिक स्थळ पहाटे जेसीबी लावून पाडल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Ahilyanagar Police 1
Ahilyanagar Police 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar latest news today : अहिल्यानगर शहरात धार्मिक स्थळ पहाटं जेसीबीने उद्ध्वस्त करण्याचा प्रकार झाला. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात शहरात मोठा शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

दोन 'SRPF'च्या तुकड्या, शस्त्रधारी पोलिस, शीघ्र कृती दल, पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस बळ, पोलिस उपअधीक्षक, अतिरीक्त पोलिस अधीक्षक आणि स्वतः पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी एका मुस्लिमाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या तपासणीवरून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुस्लिमांचे समावेश आहे, अशी माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी दिली.

अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यान हे धार्मिक स्थळ आहे. काही समाजकंटकांनी आज (ता. 24) पहाटे तीन वाजता हे धार्मिक स्थळ पाडण्याचा प्रकार केला. काही प्रत्यक्षदर्शींनुसार 'जेसीबी'चा वापर केल्याचे देखील म्हणणे आहे. धार्मिक स्थळा पाडले जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना (Police) मिळताच, मोठ्या बंदोबस्तानं पोलिस बळ गांधी मैदानात पोचलं.

मागील दोन दिवसांपासून दोन गटांत या धार्मिक (Temples) स्थळावरून वाद आहेत. आज पहाटे या दोन्ही गटातील काहींनी धार्मिक स्थळाला गालबोट लावण्याचा प्रकार केला. जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पहाटेपासूनच शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केलं आहे.

Ahilyanagar Police 1
Mazi Ladki Bahin Yojana scam : कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात किती, बोगस लाडक्या बहिणी; जाणून घ्या एका क्लिकवर...

मागील दोन दिवसांपासून दोन गटांत या धार्मिक स्थळावरून वाद आहेत. आज पहाटे या दोन्ही गटातील काहींनी धार्मिक स्थळाला गालबोट लावण्याचा प्रकार केला. जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पहाटेपासूनच शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केलं आहे.

Ahilyanagar Police 1
Sangram Bhandare : नथूराम गोडसेचे समर्थन करणाऱ्या भंडारेंनी पुन्हा थोरातांना डिवचले; म्हणाले, '...तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द...'

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे धार्मिक स्थळ पाडण्यात सहभागी असलेल्या तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच जेसीबी देखील जप्त करण्यात आला आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवरील अफवांना बळी पडू नये. यासंदर्भात काही चुकीची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याच, त्याची माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना द्यावी. तसेच सायबर सेल देखील समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सोमनाथ घार्गे यांनी दिल्या आहेत.

'AIMIM'चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी उद्ध्वस्त झालेल्या धार्मिक स्थळाची पाहणी केली. त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. 'काहींना अहिल्यानगरमध्ये दंगल घडवायची आहे. कोणत्याही धार्मिक स्थळाबरोबर असा प्रकार करणे हे मर्दानगीचं काम नाही. आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. ते करत असलेल्या कारवाई देखील पाठिंबा आहे. पण, कारवाई करताना धार्मिक स्थळ पाडणाऱ्यांमागे कोण सूत्रधार आहे, कोण मास्टरमाइंड आहे, त्याचा हेतू काय आहे, याचा देखील तपास करावा', अशी मागणी केली.

हे धार्मिक स्थळ हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक आहे. तिथं हिंदू सर्वाधिक पूजेसाठी येतात. आणि त्याच धार्मिक स्थळाबाबत असे होत आहे म्हटल्यावर यामागे नक्कीच मोठं षड्‍यंत्र असल्याचा संशयही डॉ. परवेज अशरफी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहराच्या मध्यवर्ती अशी घटना झाल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. शहरात कोणताच अनुचित प्रकार नको म्हणून, दोन 'SRPF'च्या तुकड्यांसह शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त मैदानात उतरवला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडेंनी शहरातील फिक्स पाईंट वाढवले असून, फिल्डवर उतरून प्रत्येक गोष्टीची शहानिशा करत आहे. यामागील मास्टरमाइंड आणि दोन गटात नेमका कोणत्या मुद्यांवर तणाव होता याचा तपास केला जाईल, असे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com