Sangram Bhandare : नथूराम गोडसेचे समर्थन करणाऱ्या भंडारेंनी पुन्हा थोरातांना डिवचले; म्हणाले, '...तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द...'

Sangram Bhandare On Balasaheb Thorat : तथाकथीत कीर्तनकार संगामबापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना, तर आम्हाला नथूरामजी गोडसे व्हावे लागेल असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते.
Balasaheb Thorat And Sangambapu Bhandare
Balasaheb Thorat And Sangambapu Bhandaresarkarnama
Published on: 
Updated on: 

Summary :

  1. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पुन्हा एकदा संग्रामबापू भंडारे यांनी धमकीवजा इशारा दिला आहे.

  2. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

  3. थोरातांच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून आधीच निषेध मोर्चे काढण्यात आले असून वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

Nashik News : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना, तथाकथीत कीर्तनकार संगामबापू भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी आम्हाला नथूरामजी गोडसे व्हावे लागेल असे म्हटले होते. यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेसकडून या वक्तव्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती. तर थोरात यांच्या समर्थनार्थ संगमनेर येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता.

यानंतर आता पुन्हा एकदा संग्रामबापू भंडारे यांनी थोरात यांना डिवचले आहे. त्यांनी थोरातांच्या समर्थनानंतर आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याची भाषा आता काही लोक करू लागले असल्याचा आरोप केला आहे. तर आपली गाडी फोडायची तर फोडा, पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला करू नका. आणि जर तसा हल्ला केलाच तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल असा इशारा दिला आहे. सध्या याचा एक व्हिडिओ समोर येत असून यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

Balasaheb Thorat And Sangambapu Bhandare
Sangrambapu Bhandare controversy : तथाकथित महाराजांचा 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा, थोरातांच्या पथ्यावर; कीर्तनांना हजेरी लावण्याच्या सपाटा, सत्ताधारी-विरोधक पुरते घायाळ

बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर थोरातही विविध कीर्तन कार्यक्रमांना जात होते. त्यांनी संग्रामबापू भंडारे यांचा भांडा फोड करणारा लाव रे तो व्हिडिओही समोर आणला होता. ज्यानंतर हे प्रकरण आणखी तापले आहे.

आता भंडारे यांचा पुन्हा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्याच त्यांनी, थोरात यांच्या समर्थकांचा व्हिडीओही पुढे आणला आहे. ज्यात बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. त्यानंतर आळंदी मधील महाराजांच्या गाड्या फोडण्याची भाषा लोक करत असल्याचा दावा भंडारे यांनी केला आहे.

तसेच त्यांनी आपल्या या व्हिडिओत माझी गाडी फोडायची तर फोडा. पण इतर धर्म प्रचारकावर हल्ला करू नका अशे आवाहन केले आहे. तसेच या आवाहनाबरोबरच त्यांनी कुठल्याही धर्म प्रचारकावर हल्ला झाल्यास आपल्याला आपल्या नावातील बापू शब्द काढाला लागेल. आणि फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल असा इशारा दिला आहे.

Balasaheb Thorat And Sangambapu Bhandare
Sangrambapu Bhandare controversy : कीर्तनकाराचा 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा; इकडं भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांची पोलिस अधीक्षकांकडे धाव!

FAQs :

प्रश्न 1: संग्रामबापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना काय इशारा दिला?
उत्तर: त्यांनी "माझी गाडी फोडा पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला करू नका, नाहीतर बापू शब्द काढून टाकीन" असा इशारा दिला.

प्रश्न 2: काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर: काँग्रेसने यावर जोरदार टीका केली असून आधीच निषेध मोर्चे काढले आहेत.

प्रश्न 3: या वक्तव्याचा परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.