
Shani Shingnapur temple trust controversy : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांच्या मृत्यूमागे गंभीर काहीतरी कारण असल्याची शंका नातेवाईकांकडून केली जाऊ लागली आहे.
मयत नितीन शेटे यांचे पुतणे तथा देवस्थानचे माजी विश्वस्त वैभव शेटे यांनी समोर येत नितीन यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले का? पोलिसांनी यात सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
शनिशिंगणापूर (ShaniShingnapur) इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळाफास घेतला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातून सुरू झालेली चौकशी आणि शेटे यांची आत्महत्या, यामुळे वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
देवस्थानच्या पाच बनावट अॅपप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. राज्याचे भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बनावट अॅपप्रकरणात शेटे यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत असल्याने कदाचित त्या भीती पोटी त्यांनी गळफास घेतला असावा, असे निरीक्षण नोंदवलं आहे.
मंत्री विखे पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर आणि सुरू असलेल्या चर्चेमुळे नितीन शेटे यांचे पुतणे आणि देवस्थानचे माजी विश्वस्त वैभव शेटे यांनी या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे. वैभव शेटे यांनी बनावट अॅप घोटाळ्याची चौकशी चालू आहे. यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचे समन्स किंवा त्याची चौकशी झालेली नव्हती. मात्र आम्हाला वाटतं हा फक्त अॅप घोटाळा नसून काहीतरी गंभीर प्रकरण आहे, कारण एक माणूस भ्रष्टाचार करेल असं कधीही होऊ शकत नाही, अशी मोठी शंका उपस्थित केली आहे.
'काही गोष्टी संगनमताने झाल्या असतील, कारण उप कार्यकारी अधिकारी यांच्यावर मुख्य कार्यकारी त्यानंतर विश्वस्त, आणि पुढे विश्वस्त देखील कोणाचा तरी ऐकत असतील आणि ते कोणाचं ऐकत असतील हे संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. जीव गेलेल्या माणसांवर आज सगळे ब्लेम करून मोकळे होतील. मात्र याची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे', असे वैभव शेटे यांनी व्यक्त केली.
'नितीन शेटे यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी मागील एक महिन्यापासूनचे सगळे कॉल डिटेल्स, CDR, त्यांचे व्हाट्सअप चॅट काढावे आणि कोणी कोणी राजकीय नेते त्यांना भेटले, कोणी कोणी त्यांच्यावर दबाव आणला हे शोधून काढण्याची गरज आहे, असे पुतणे वैभव शेटे यांनी म्हटले.
वैभव शेटे यांनी पुढं येत, मोठा शंका उपस्थित केल्याने, नितीन शेटे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट आला असून ही आत्महत्या राजकीय बळी तर नाही ना, अशा चर्चेला पेव फुटलं आहे. वैभव शेटे यांच्या मागणीनुसार पोलिस आता तपास करणार का? नितीन शेटे यांच्या मृत्यूच्या तपासासाठी वेगळे पथक तयार केले जाणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.