Parinay Fuke taunt Nana Patole : 'नाना पटोले, तुम्ही बॅलेटवरही हरला, आता ग्राम पंचायतीकडे लक्ष द्या'; आमदार फुकेंनी टायमिंग साधलं

Bhandara DCC Bank Poll BJP Parinay Fuke Taunts MVA Nana Patole : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खुले आव्हान देणारे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा बँक पराभवाचा मोठा झटका बसला आहे.
Parinay Phuke taunt Nana Patole
Parinay Phuke taunt Nana PatoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parinay Phuke reaction on MVA loss : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खुले आव्हान देणारे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठा झटका बसला आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सरकाही बँक, भंडारा दूध संघ आणि आता भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीत ते सातत्याने 'ईव्हीएम'वर शंका व्यक्त करीत होते.

विधानसभेत झालेल्या पराभवानंतर बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी ते करीत आहेत. याच मुद्यावरून गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सहकारी बँकेची निवडणूक बॅलेट पेपवरच झाली, तरी तुमचे पॅनेल का पराभूत झाले अशी विचारणा केली. विधानसभेच्या निवडणुकीतही ते थोडक्यात बचावले. आता त्यांना कुठेच स्कोप नाही. त्यामुळे पटोले यांनी आता ग्राम पंचायत निवडणुकीकडे लक्ष द्यावे, असा टोलाही फुके यांनी लगावला.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतःचा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचेच कट्टर समर्थक भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनीही दावेदारी दाखल केली होती. त्यानंतर पटोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतरही त्यांना भंडारा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही.

भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीने (Mahayuti) सर्वाधिक जागा जिंकल्या. बँकेच्या 21 संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे 11 संचालक निवडून आहे आहेत. 6 संचालकांची अद्याप मतमोजणी करण्यात आलेली नाही. पटोले यांच्या पॅनेलचे फक्त चार उमेदवार निवडून आले आहेत.

Parinay Phuke taunt Nana Patole
Vijay Wadettiwar on BJP Mahayuti : महामंडळ वाटप, हा सरकराचा नवा 'लॉलीपॉप'; विजय वडेट्टीवारांचा भाजप महायुतीला टोला

विशेष म्हणजे खासदार पडोळे पराभूत झाले आहेत. त्यांचा महायुतीचे सुनील फुंडे यांनी पराभव केला. ही निवडणूक महायुतीने प्रफुल पटेल, परिणय फुके आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात लढवली होती. भोंडेकर यांना चार जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी त्यांचा एकच उमेदवार निवडून आला आहे.

Parinay Phuke taunt Nana Patole
Mumbai Nashik ED searches : 'ईडी' पहाटे चारपासून 'अ‍ॅक्शन मोड'वर; आयुक्त अनिलकुमार यांच्या निवासस्थानसह 12 ठिकाणी छापे

विशेष म्हणजे 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत नाना पटोले विरुद्ध परिणय फुके असा अटीतटीचा सामना रंगला होता. 2024च्या निवडणुकीत नाना पटोले पराभूत झाले होते. मात्र टपाल मतांनी त्यांना तारले.

काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकापाठोपाठ पराभव होत असल्याने परिणय फुके यांनी पटोले यांना आता ग्राम पंचायत निवडणुकीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. आता त्यांना राज्याच्या तसेच सहकार क्षेत्रातील निवडणुकीत काही स्कोप शिल्लक राहिला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.