

Shevgaon Nagar Palika election news : महायुतीत अखरेच्या क्षणी बंडखोरी केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार अर्ज दाखल केला. महायुतीमधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्या लांडे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं. शेवगाव नगरपालिका निवडणुकीत, एकमेकींविरोधात अटीतटीची लढाई लढली. उणीधुणी काढली. या लढतीत माया मुंडेंनी विजय मिळवला.
राजकारणातील वैर हे पिढ्यान् पिढ्या टिकतं, असे सांगितले जाते. पण विद्या लांडे यांनी केलेल्या कृतीने याला छेद दिला. शेवगाव नगरपालिका निवडणुकीत जिंकून आलेल्या माया मुंडे यांना घरी बोलवत विद्या लांडे यांनी त्यांचा सन्मान करत, शेवगावच्या विकासासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. यावेळी माया मुंडे यांचे पती प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे देखील उपस्थित होते.
शेवगाव नगरपालिका निवडणुकीत (Municipal Election) नगराध्यक्षपदासाठी माया अरुण मुंढे (एकनाथ शिंदे शिवसेना), विद्या लांडे (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस), रत्नमाला महेश फलके (भाजप) आणि परवीन एजाज काझी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यात चुरशीची लढत झाली.
या निवडणुकीत माया मुंडे यांनी अवघ्या 86 मतांच्या फरकाने विद्या लांडे यांचा पराभव करत विजय मिळवला. माया मुंडे यांच्या विजयामुळे शेवगाव शहरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना हा एक प्रभावी तिसरा पर्याय म्हणून पुढे येत आहे.
दरम्यान, मुंबई इथं अरुण मुंडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा माया मुंडे यांच्यासह भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेतली. ॲड. शिवाजी काकडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे, उदय मुंडे, पृथ्वी काकडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लांडे पाटील यांनी आपल्या निवासस्थानी विजयी उमेदवार माया मुंडे यांना आमंत्रित करीत पत्नी विद्या लांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. अरुण मुंडे यांनी, पराभवानंतरही मोठ्या मनाने विद्या लांडे यांनी आमचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या, हीच सकारात्मक राजकारणाची पावती आहे. येणाऱ्या काळात शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू. सर्व पक्षांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत बंडखोरांवर कारवाईचे संकेत भाजप प्रदेश कार्यालयाकडून मिळत आहे. परंतु महापालिका निवडणुकांमध्ये ही कारवाई सध्या तरी टाळली जाऊ शकते. पुढे ही कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिकेबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या घोषणांची शक्यता आहे. या निवडणुकांमुळे बंडखोरांवर सध्या तरी कारवाई होणार नाही, असे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.