
Sangamner crime news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिलेदार आमदार अमोल खताळ यांनी वाळू चोरांना थेट आव्हान दिलं आहे. वाळू चोरांना रोखताना, आमदार खताळ यांनी स्वतः रात्री वाळू चोरांचा पाठलाग केला.
वाळू चोरांना धडा शिवकण्यासाठी आता 'रिअल अॅक्शन' केली जाईल, असे सूचक संकेत अमोल खताळ यांनी दिले. याचबरोबर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह आमदार खताळ यांनी उपस्थित करताना, वाळू चोरांविरुद्ध पुढं आरपारची लढाई लढणार असल्याचे संकेत दिले.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्वतः कारवाई केली. आमदार खताळ यांनी वाळू चोरांविरुद्ध कारवाई केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याची संगमनेरमध्ये चर्चा होती. या कारवाईसंदर्भार आमदार खताळ यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर देखील पोस्ट शेअर केली आहे.
आमदार खताळ यांनी स्वतःचे वाहन थांबवत तात्काळ पोलिस (Police) प्रशासनाला पाचारण केले आणि संबंधित वाळू वाहतूक करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, "मला आमदार असूनही रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागते, मग प्रशासन झोपलंय का? संगमनेरमध्ये काही भागांमध्ये अवैध वाळू चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हे वाळू चोर कोणाच्या छत्र छायेखाली काम करत आहेत हे सर्व तालुक्याला माहीत आहे. यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असा मी शब्द देतो."
ते पुढे म्हणाले, "या चोरांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, शेतीचे नुकसान होते आणि बेफाम वाहनचालकांमुळे नागरिकांना दहशतीखाली जीवन जगावं लागत आहे. प्रशासनातील काही घटक वाळू चोरांशी हातमिळवणी करून हा व्यवसाय चालवत आहेत. पण आता याला आळा बसेल, असा विश्वास मी जनतेला देतो."
ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी आमदारांच्या या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा आमदार अमोल खताळ यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे थांबेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी संगमनेरमधील वाळू चोरीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. विखे पिता-पुत्रांनी या मुद्याला चांगलीच धार दिली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वाळू चोरच संगमनेर तालुका चालवतात, असे विधान करत त्यावेळी खळबळ उडवून दिली होती. आता त्यांच्यात तालमीत संगमनेरमध्ये आमदारकीला गवसणी घालणाऱ्या अमोल खताळ यांनी वाळू चोरांविरुद्ध थेट कारवाई करून प्रशासनाला देखील हादरा दिला. त्यामुळे वाळूचा हा मुद्दा पुढं काय-काय राजकारण दाखवतो, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.