
Shrirampur political event : राष्ट्रीय अन् राज्य पातळीवर काँग्रेस अन् भाजप या दोन पक्षांमधील सर्वच पातळीवर संघर्ष आहे. भाजपने देशातील 2014पासून सत्तेची वाटचाल करत, काँग्रेसला शह देत आहे. काँग्रेसमधील दिग्गज नेते, मागे-पुढे न बघता थेट सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
परंतु काँग्रेसच्या विचारसरणीवर भरोसा असलेले गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लाखो कार्यकर्ते आहे. अहिल्यानगरमध्ये देखील त्याला अपवाद नाही. परंतु बदली राजकीय परिस्थिती बघता कोण कधी काय निर्णय घेईल, सांगता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर असताना श्रीरामपूरमध्ये भाजपचे दिग्गज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन् काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार हेमंत ओगले एकत्र आले होते.
श्रीरामपूर (Shrirampur) औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या उच्चदाब वीज उपकेंद्राच्या कार्यक्रमात विखे अन् ओगले एकत्र आले होते. व्यासपीठावर दोघे शेजारीच बसले होते. तसं ओगले हे विखे पाटील यांचे एकेकाळचे समर्थक. परंतु विखे पाटलांनी भाजपची वाट धरली. परंतु ओगले काँग्रेसमध्ये तळ ठोकून राहत श्रीरामपूरसाठी काँग्रेसचे तिकीट मिळत, विधिमंडळक गाठले.
समर्थक आता आमदार म्हणून त्यांच्या शेजारी बसल्याचं मंत्री विखे पाटलांना (Radhakrishna Vikhe) देखील कौतुक आहे. उपकेंद्राच्या कार्यक्रमात आमदार ओगलेंनी "विखेसाहेब, आपले श्रीरामपूरवर सदैव प्रेम राहिले आहे. ते तसेच टिकून राहो, हीच आमची अपेक्षा आहे," अशी भावना व्यक्त करत सौहार्दपूर्ण राजकारणाचे संकेत दिले.
मंत्री विखे पाटलांनी, विकासासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. कारण जनतेचा फायदा हाच खरा राजकारणाचा हेतू असतो, असे सांगत, स्वच्छ राजकारणाचे संकेत दिले. विखे पाटील अन् ओगले यांनी एकाच व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यांमुळे श्रीरामपूरमधील राजकारणात चर्चांना पेव फुटलं आहे.
'गेली अनेक वर्षे पाणीप्रश्नाचे भांडवल केलं गेलं. नसलेले प्रश्न उभे करून मोर्चे, आंदोलनं झाली. मात्र, आम्ही भाषणं करत नाही, तर प्रत्यक्षात योजना राबवत आहोत', असा टोलाही विखे पाटील यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. तसेच राज्यातील जलसंधारणासाठी सुरू असलेल्या योजना, पावसाच्या पाण्याचा साठा आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी १ लाख कोटींच्या निधीतून राबवले जाणारे प्रकल्प यांची माहितीही त्यांनी दिली.
उपविभागीय कार्यालयाचे विभाजन, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, ट्रान्सफॉर्मर टाकणे आदी मागण्या आमदार ओगले यांनी यावेळी मांडल्या. विखे यांनी हे प्रस्ताव महापारेषणकडे नसून महावितरणकडे पाठवावे लागतील. 'तालुका मोठा असल्याने ही मागणी रास्त आहे. मी स्वतः लक्ष घालेन, तुम्ही चिंता करू नका. आपण बरोबरच राहू. बरोबर राहिलो तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे', असे म्हणताच कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी काहींनी नुकताच ससाणे यांचा एक गट भाजपवासी झाल्याटची आठवण करून दिली. तो धागा पकडत विखे म्हणाले, 'राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. आगले यांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे. पक्ष, राजकारणासाठी नाहीतर विकासाच्या दृष्टीने त्यांनी सोबत राहावे, असे सांगताना ओगले व सहाकर्याबरोबरच नुकतेच भाजपवासी झालेल्या ससाणे गटातील पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केल्याने चर्चांना उधान आले आहे'.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.