
Dhule ZP Election : जिल्हापरिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना जाहीर झाल्याने आता ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे. तब्बल साडेतीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीला आता एक वेगळे राजकीय वळण व महत्व येणार आहे.
धुळ्यात जिल्हा परिषदेचे ५६ गट असून चार पंचायत समित्यांचे ११२ गण आहेत. त्यावर नागरिकांना २१ जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. नवीन आराखड्यात आता शिरपूर तालुक्यात १४, शिंदखेडा १०, साक्री १७, तर धुळे तालुक्यात १५ गट असणार आहेत. या आराखड्यात धुळे तालुक्यातील एक गट कमी झाला असून, साकक्री तालुक्यात एक गट वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचं सत्ताकेंद्र साक्री आणि शिरपूर तालुक्याच्या नियंत्रणात राहिल, असे स्पष्ट दिसते आहे.
शासनाच्या १२ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारावर ही गट आणि गणांची पुनर्रचना करण्यात आली आहे, ज्यात जिल्हा परिषदेमध्ये निवडल्या जाणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यात साक्री तालुक्यात मागच्या निवडणुकीत पिंपळनेर हा जिल्हा परिषदेचा गट होता. मात्र या ठिकाणी नगरपरिषद झाल्याने या गटातील गावांचा अन्य गटात समावेश करण्यात आला आहे. तर दातर्ती हे नवीन गट तयार झाला आहे.
गट-गणांची ही निश्चिती जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक भविष्यावर थेट परिणाम करणारी ठरणार आहे, कारण याच आधारावर पुढील निवडणुका लढल्या जातील. प्रारूप मसुद्यानुसार, जिल्हा परिषदेसाठी एकूण ५६ गट निश्चित करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातून एक सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जाईल. यासोबतच, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ११२ गण निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक पंचायत समिती गणातून एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जाईल. ही गट आणि गणांची निश्चिती आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
शिरपूर तालुक्यातही राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत तालुक्यात जिल्हा परिषदेचे १४ गट होते. तीच परिस्थिती यंदा कायम ठेवली आहे. तालुक्यात पंचायत समितीचे २८ गण प्रारपू मसुद्यात समाविष्ट करण्यात आले आहे. नवीन आराखड्यानुसार शिंदखेडा तालुक्यात १० गट असणार आहेत. साक्री तालुक्यात १७ गट असणार आहेत. तर धुळे तालुक्यात १५ गट असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.