BJP Shivaji Kardile : कर्डिले पिता-पुत्राविरुद्ध घमासान होणार; 'मविआ' खिळखिळीचा फायदा कोणाला? कार्ले, झोडगे यांचे भवितव्य टांगणीला

Ahilyanagar Zilla Parishad Election: BJP MLA Shivaji Kardile to Face MVA in Nagar Taluka : नगर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेविरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.
BJP Shivaji Kardile
BJP Shivaji KardileSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Zilla Parishad election : नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या. नगर तालुक्यात भाजप आमदार शिवाजी कर्डिलेविरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

भाजप आमदार कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले त्यांचे राजकीय नशिब इथं आजमावू शकतात. वाळकी गटातून मागील तीन टर्मपासून या गटावर वर्चस्व ठेवणारे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्याविरोधात ते लढू शकतात. तर नगर तालुक्यातील दिग्गज नेत्यांपैकी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व शरद झोडगे यांचे गट व गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.

निंबळक व वाळकी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तर नवनागापूर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समिती गणामध्ये चिचोंडी पाटील, चास, वाळकी, गुंडेगाव हे गण खुले झाले आहेत. जेऊर गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे तेथून इच्छुक असलेल्या भाजपचे (BJP) युवानेते अक्षय कर्डिले वाळकी गटाकडून लढण्याची शक्यता आहे.

नवनागापूर, केकती, निंबळक या गणांमधून पंचायत समिती सभापतिपदाच्या दावेदार निवडणूक लढतील. वाळकी गटातून बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) नुकताच दाखल झालेले, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व शरद झोडगे यांचे गट व गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला बैठकीत तनिष्का पंगुडवाले या सहा वर्षीय मुलीच्या हस्ते पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या.

BJP Shivaji Kardile
Dhananjay Munde Manoj Jarange criticism : भर सभेतून पवारांच्या शिलेदाराचा धनंजय मुंडेंना फोन; जरांगेंवर एका वाक्यात बरसले, टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही!

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील राजकीय क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत राज्यातील सत्ताधारी गटाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तालुक्यातील बहुतांशी संस्थांचे नेतृत्व आहे. महाविकास आघाडीला जन्म देणारे माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या निधनानंतर आघाडीत विस्कळीतपणा आला आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीतील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह रामदास भोर, डॉ. दिलीप पवार, शरद झोडगे, गुलाब शिंदे यांनी शिंदे गटाशी जवळी केली आहे.

BJP Shivaji Kardile
India first bullet train : 320km प्रतितास वेगाने धावणारी भारताची पहिली 'बुलेट ट्रेन' लवकरच धावणार; रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

वाळकी अन् निंबळकमध्ये घमासान

वाळकी व निंबळक या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये मोठे राजकीय घमासान होणार आहे. निंबळक गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, अरुण होळकर यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके तसेच विजय शेवाळे, बंडू सप्रे यांच्या नावाची चर्चा आहे. जेऊर गटातून माजी सदस्या भाग्यश्री मोकाटे यांच्याबरोबरच जेऊर व घाटाखालील गावातून इच्छुकांची संख्या जास्त आहे.

पंचायत समिती गण

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग- देहरे, सर्वसाधारण महिला - नवनागापूर, केकती, निंबळक, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला- बुऱ्हाणनगर, जेऊर. अनुसूचित जाती- नागरदेवळे, अनुसूचित जाती महिला - दरेवाडी, सर्वसाधारण- चिचोंडी पाटील, चास, वाळकी, गुंडेगाव.

‘वाळकी’तील घमासान

वाळकी जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील तीन टर्मपासून या गटावर वर्चस्व ठेवणारे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्याविरोधात बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे यांना पुढे केले होते. सोडतीनंतर चित्र बदलले आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पूत्र भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याबाबत कर्डिले यांच्या बंगल्यावर वाळकी गटातील कार्यकर्त्यांच्या चकरा सुरू झाल्या असून, कर्डिले यांनी लढावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com