Congress News: महापालिकेच्या व्यावसायिक परवाना शुल्कविरोधात काँग्रेस आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

Congress and Ahmednagar Municipal Corporation : महापालिका आयुक्तांना निवेदन पाठवून शहर काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Congress and Ahmednagar Municipal Corporation
Congress and Ahmednagar Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : व्यापारी, दुकानदारांकडून करण्यात येणाऱ्या व्यावसायिक परवाना शुल्क वसुली निर्णयाला काँग्रेसच्या विरोधानंतर विविध व्यापारी संघटनांसह अन्य व्यावसायिकांनीदेखील तीव्र विरोध सुरू केला आहे. काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विविध संघटनांसमवेत संवाद मोहीम सुरू आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या वतीने महासभेत मंजूर करण्यात आलेला ठराव विखंडित करण्याची जाहीर मागणी काळे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. येत्या तीन डिसेंबरपर्यंत सदर ठराव विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे महापालिकेने पाठवला नाही, तर चार डिसेंबरपासून किरण काळे बाजारपेठेमध्ये एमजी रोड या ठिकाणी दोनदिवसीय धरणे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा व काँग्रेस व्यापार, उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress and Ahmednagar Municipal Corporation
Shankarrao Gadakh News : "जनमत तयार करण्यात जिल्ह्यातील नेते कमी पडत आहेत" !

महापालिका आयुक्तांना सोमवारी सकाळी लेखी निवेदन पाठवून शहर काँग्रेसने इशारा दिला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, राज्याचे नगर विकास प्रधान सचिव, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनादेखील निवेदन पाठवण्यात आले आहे.

संचेती म्हणाले, "तीन डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त संघटनांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सगळ्यांचाच या निर्णयाला विरोध आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस व्यापार, उद्योग आघाडी सर्वांना एकत्रित करण्याचे काम करीत आहे. कोणत्याही परिस्थिती व्यापाऱ्यांवरील हा अन्यायकारक निर्णय हाणून पाडला जाईल."

"मनोज गुंदेचा यांनी या निर्णयावर दुकानदारांमध्ये तीव्र संताप आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याच पक्षाच्या एकाही नगरसेवकाने यावर आपली भूमिका जाहीर केली नाही. महापालिका अधिकारी दखल घेत नाहीत. नगरसेवक, अधिकाऱ्यांवर शहर लोकप्रतिनिधींचा दबाव आहे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या दारात जावे. उंबरे झिजवावेत. मगच विचार करू, अशी भाषा ते खासगीत बोलू लागले आहेत."

"किरण काळे यांनी या विषयावर व्यापारी, दुकानदारांच्या मागे काँग्रेसची ताकद उभी केली आहे. लोकशाही आहे. हे संबंधितांनी विसरू नये, काळे हे व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलनाला बसणार आहोत, असे सांगितले. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि शहरातील व्यापारी सहभागी होणार असल्याची माहिती दशरथ शिंदे आणि माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी दिली.

(Edited By - Ganesh Thombare)

Congress and Ahmednagar Municipal Corporation
BJP Arun Mundhe: माजी जिल्हाध्यक्षावर वाळूचोरीचा गुन्हा; भाजपने दिला थेट आंदोलनाचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com