Shankarrao Gadakh News : "जनमत तयार करण्यात जिल्ह्यातील नेते कमी पडत आहेत" !

Jayakwadi Water Issue : रस्त्यावरील लढाई आणि जनमत एकत्रित करून सरकारवर दबाव वाढवणे गरजेचे
Shankarrao Gadakh
Shankarrao Gadakh Sarkarnama

Ahmednagar News : नगर नाशिक जिल्ह्यातून प्रचंड विरोध झाल्यानंतरही अखेर समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जलसंपदा विभागाने आदेश काढले आहेत. त्या अनुषंगाने कालपासून नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्यास मोठा विरोध झाल्या नंतर देखील पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील नेते कमी पडत असल्याचे मत नेवाशाचे शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार शंकराव गडाख यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

गडाख म्हणाले, "समन्यायी पाणी वाटप कायदा स्पष्ट आहे. त्या कायद्यानुसार पाणी सोडावेच लागणार आहे. आयोगाने कुठल्या धरणातून किती पाणी सोडले जावे हे स्पष्ट केलेले आहे. त्याबद्दल दुमत नाही, मात्र आता यासाठी कायद्याच्या लढाई पेक्षा रस्त्यावरील रस्त्यावरील लढाई लढून जनमत तयार करणे गरजेचे आहे. विरोध करूनही पाणी सोडले जात असल्याने जनमत तयार करण्यात जिल्ह्यातील नेते कमी पडत आहेत. असे दिसून येत आहे. एकत्रित न होण्यामागे त्या-त्या भागातील राजकीय नेत्यांचा स्वार्थ दिसून येतोय. त्यामुळे आता यापुढे नगर नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी एकत्रित येत जनमत तयार करून सरकारवर दबाव वाढवणे गरजेचे आहे," असे गडाख यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shankarrao Gadakh
Jayakwadi Water Issue : जायकवाडीची तहान मुळा धरण भागवणार !

गडाख यांनी मुळा धरणातून सोडले जाणारे दोन टीएमसी पाणी हे निळवंडे धरणातून सोडावे अशी मागणी यापूर्वी केली होती. निळवंडे धरणाचे कालव्यांचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुळाऐवजी निळवंडे धरणातून दोन टीएमसी पाणी सोडले जावं त्यामुळे मुळा पट्ट्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचबरोबर भंडारदरा आणि मुळा धरणातील पाणी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना वापरता येईल असं मत व्यक्त केले आहे.

नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणे मोकळी होणार !

आंदोलनात मी माझी विस्तृत भूमिका यापूर्वीच मांडली आहे. आता पाणी सोडलं जात असताना काहीही करता येणार नाही. मात्र भविष्यासाठी विरोध करत राहावे लागणार आहे. यावर्षीपेक्षा पुढील वर्षी गंभीर परिस्थिती असू शकणार आहे. आम्ही मागील वर्षी काटकर कसर करत मुळा धरणात साडेचार टीएमसी पाणी शिल्लक ठेवले होते. त्यामुळे धरण यंदा २० टीएमसीच्या पुढे कसेबसे भरले गेले. मात्र जायकवाडीला आता पाणी सोडावे लागणार असल्याने पुढील वर्षी कमी पाऊस झाल्यास धरणं भरणं अवघड होणार आहे. त्यात जायकवाडीसाठी कायद्याच्या अनुषंगाने पाणी सोडल्यास नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणे मोकळी होणार आहेत.

Shankarrao Gadakh
Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना मान्य; पण...

माझ्या भूमिकेने शिवसेनेतील मराठवाड्यातील नेते ना खुश!!:

काही प्रश्नाबाबत कुठेतरी स्पष्ट भूमिका मांडवी लागते. मी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला. त्यावेळेस मी शिवसेनेचा असल्याने मराठवाड्यातील अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. मात्र दोन्ही बाजूने बोलता येत नाही, त्यावेळेस कुठेतरी स्पष्ट भूमिका मांडावी लागते असं गडाख यांनी स्पष्ट केले. वास्तविक नगर नाशिक जिल्ह्यातून जाणारे पाणी प्रत्यक्षात जायकवाडी धरणात किती पोहोचणार हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे गडाख यांनी सांगितले. पाण्याचा मोठा अपव्यय होत पाणी जिरण्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे केवळ एक-दीड टीएमसी पाणीही पोहोचेल की नाही अशी शंका ही गडाख यांनी व्यक्त केली आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

Shankarrao Gadakh
Bullock Cart Stone Pelting News : बैलगाडा शर्यतीत गोंधळ; भाजप खासदार अनिल बोंडेंवर दगड फेकले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com