Bjp News : नगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासक 'राज'ची धास्ती; फडणवीसांच्या भेटीसाठी धडपड

Ahmednagar Bjp Office Bearers to Meet Devendra Fadnavis : नगरमधील भाजप पदाधिकारी एका मोठ्या चिंतेत पडले आहेत...
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : नगर महापालिकेची लोकनियुक्त कारभाराची मुदत 31 डिसेंबरला संपत आहे. यानंतर प्रशासक येण्याची चर्चा आहे. प्रशासक आल्यानंतर लोकनियुक्त कारभार संपुष्टात येऊन, त्याचा परिणाम थेट नागरी सुविधांवर होणार आहे. यामुळे भाजपच्या नगर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे नियोजन करत आहेत. या भेटीमागे वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा होणार असून, भविष्यात पक्ष संघटना कोणत्या मुद्द्यावर काम करणार आहे, याचा लेखाजोखा देणार असल्याचे संकेत भाजपचे शहराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिले.

Devendra Fadnavis
Parner Politics: नीलेश लंकेंचं टेन्शन वाढणार ? रोहित पवारांनी विजय औटींना दिला मोठा शब्द

राज्यात 29 महापालिका आहे. यातील 25 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. इचलकरंजी आणि जालना येथील दोन नवीन महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तसेच नगर आणि धुळे महापालिकेची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2024 मध्ये राज्यातील एकाही महापालिकेवर लोकनियुक्त कारभार नसणार आहे. नगरमध्ये लोकनियुक्त कारभार नसलेल्या महापालिकेचा कारभार नगरकर पहिल्यांदा अनुभवणार आहे. त्यामुळे नगरसेवकांमार्फत होणाऱ्या कामांना मर्यादा पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी नगर शहर भाजप करणार असल्याचे संकेत अभय आगरकर यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभय आगरकर यांनी भाजपच्या नगर शहराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. नवीन-जुन्यांचा मेळ या कार्यकारिणीत दिसतो. महापालिकेवरील येऊ घातलेला प्रशासक आणि नव्याने जाहीर केलेली कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे नियोजन सुरू आहे. नगर शहर भाजपअंतर्गत याची चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत लोढा यांनी आगामी काळात नगर शहरात भाजपचाच आमदार असला पाहिजे. यासाठी कोणता आयात उमेदवार नको, अशी जाहीर भूमिका मांडली आहे. याचवेळी अभय आगरकर यांनी भाजपचे नगरसेवक ठोस राजकीय भूमिका घेण्याची वेळ आल्यावर पुढे येत नाहीत, अशी जाहीर नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट चर्चेचा विषय ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी नगर शहर पक्ष संघटनेची बैठक घेतली जाणार आहे. यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भूमिका समजावून घेऊन, भविष्यात कोणत्या मुद्द्यांवर पक्ष संघटना काम करणार आहे. त्याला राज्य आणि केंद्र पातळीवर कसे बळ हवे, याचा लेखाजोखा मांडणार आहोत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे अभय आगरकर यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Ahmednagar Politics : राम शिंदे अन् रोहित पवारांचे पुन्हा एकमेकांविरुद्ध शक्तिप्रदर्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com