Ahmednagar Politics : राम शिंदे अन् रोहित पवारांचे पुन्हा एकमेकांविरुद्ध शक्तिप्रदर्शन

Rohit Pawar And Ram Shinde News : हे दोन्ही आमदार पुन्हा एकदा एकमेकांविरोधात शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत दिसत आहेत.
Rohit Pawar, Ram Shinde News
Rohit Pawar, Ram Shinde NewsSarkarnama

प्रदीप पेंढारे

Ahmednagar News : दिवाळी फराळाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील नेते आगामी राजकारणाची चाचपणी करत आहेत. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमानंतर आता भाजपचे (BJP) नेते आमदार प्रा. राम शिंदे यांनी उद्या गुरुवारी चौंडी (ता. जामखेड) येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांनी याच दिवशी आणि सायंकाळच्या वेळी, सभा आयोजित केली आहे. यामुळे हे दोन्ही आमदार पुन्हा एकदा एकमेकांविरोधात शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे फटाके कोणाचे फुटणार, अशी चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम शिंदे यांनी उद्याच्या दिवाळी फराळाची जोरदार तयारी केली आहे. नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आंमत्रण देण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमातून ते सायंकाळी संवाद साधणार आहेत. दिवाळी फराळानिमित्ताने माझ्या मतदारसंघातील लोकांसह स्नेहींचे तोंड गोड करणारच आहे. फटाके मीच फोडणार, असे सूचक विधान राम शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले आहे.

Rohit Pawar, Ram Shinde News
Gurmeet Singh Kunnar : राजस्थानमध्ये काँग्रेस उमेदवाराचे निधन; 199 जागांवरच होणार निवडणूक

ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजप गटाने कर्जत-जामखेडमध्ये सरशी केली आहे. याचा आनंद राम शिंदे (Ram Shinde) यांनी साजरा केला आहे. यातच ते मतदारसंघात राज्य सरकारकडून विकासकामांसाठी निधी खेचून आणत आहेत. जनसंपर्कालादेखील त्यांच्या धार आली आहे. यातून त्यांचा आत्मविश्वास दिसत आहे.

राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत. आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे घोंगडे भिजत पडून आहे. यात नेमकी संधी कोणाला, याबाबत बराच खल झालाय. आता अपात्रतेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठी सावध भूमिकेत आहेत. यामुळे मंत्रिमंडळात बरीच उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. यात कधीही कोणालाही संधी मिळू शकते.

यासाठी सर्वाधिक भाजप आमदारांकडून चाचपणी सुरू आहे. प्रा. राम शिंदे हेदेखील यात मागे नाहीत. हा दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम तेच सांगत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) संघर्ष यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात पोहाेचण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठा आरक्षणामुळे त्यांची ही संघर्ष यात्रा स्थगित केली होती. ती आता पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे.

तत्पूर्वी आमदार पवार यांनी उद्या गुरुवारी चौंडीत सायंकाळी सभा ठेवली आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या फराळाच्या वेळेचे टायमिंग साधल्याची चर्चा आहे. राम शिंदे आणि रोहित पवार हे दोघे यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करत एकमेकांना पुन्हा आजमावून पाहत तर नाही ना, असेदेखील म्हटले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Rohit Pawar, Ram Shinde News
Raju Shetti News : 'महाविकास'ची ऑफर राजू शेट्टींनी धुडकावली; ऊसदरासाठी स्वबळावर लढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com