Ahmednagar Congress : काँग्रेसचे शिष्टमंडळ थोरातांसह पटोलेंची भेट घेणार; कारण काय?

Ahmednagar News : नगर काँग्रेसचे शिष्टमंडळ थोरातांसह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याने चर्चांना उधाण
Nana Patole, Balasaheb Thorat
Nana Patole, Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडमोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. मात्र, याच दरम्यान सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने निलंबित केलं. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले.

यानंतर काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आपल्या पक्षश्रेष्ठींकडे दिला. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. असे असतानाच आता अहमदनगर (Ahmednagar) काँग्रेसचे शिष्टमंडळ बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांना दिली आहे.

Nana Patole, Balasaheb Thorat
Prashant Bamb News : गंगापूर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बंब-ठाकरे गटात चुरस..

काळे म्हणाले, ''सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, डिझेल, पेट्रोल, गॅसचे अवाक्या बाहेर गेलेले दर यामुळे जनता हवालदिल झाली आहे.

राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणुकांचा निकाल हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढवणारा आहे. मात्र, सध्याच्या पक्षांतर्गत राजकीय स्थितीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवरच थोरात यांची लवकरच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही भेट घेणार आहोत, असं काळे यांनी सांगितलं.

Nana Patole, Balasaheb Thorat
Kasba by poll election : बंडखोर दाभेकरांची काँग्रसकडून मनधरणी; बाळासाहेब म्हणाले...

तसेच प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी देखील संवाद करणार आहोत. राज्याचे प्रभारी एच.के. पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १५ फेब्रुवारीला पक्षाच्या मुंबईतील टिळक भवन येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचे निमंत्रण जिल्हा काँग्रेसला आले आहे. वेळप्रसंगी पाटील यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.

Nana Patole, Balasaheb Thorat
Narendra Modi News : कोण आपल्या आईचे दूध प्यायलंय...; मोदींनी संसदेत सांगितला किस्सा

दरम्यान, थोरात हे राज्याचे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. तर काळे हे थोरात समर्थक म्हणून ओळखले जातात. थोरात प्रांताध्यक्ष असताना त्यांनीच काळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

मात्र, पदवीधर निवडणुकी दरम्यान अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त करण्यात आळी. यावेळी पटोले यांनी काळे यांच्यावर ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाचाही पदभार सोपविला. तर आता अहमदनगर काँग्रेसने थोरातांसह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे म्हटल्यामुळे जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com